मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेणं योग्य की अयोग्य?

तुम्हीही मासिक पाळी दरम्यान, गोळ्या घेत असाल तर नक्की वाचा

Updated: Sep 23, 2022, 06:09 PM IST
मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेणं योग्य की अयोग्य?  title=

मुंबई : मासिक पाळी (Menstrual Period) म्हटले की प्रत्येक स्त्रिला आठवतात त्या वेदणा. मासिक पाळीत त्रास (Menstrual Period Pain) होतो अशी तक्रार लाखो स्त्रीया करतात. या त्रासापासून सुटका पाहिजे म्हणून स्त्रिया अनेक गोळ्या घेतात. (Menstrual Period Pain Pills) तर कधी मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळी घेतात. (Menstrual Period Delay Pills) पण त्या गोळीचा वापर कधी आणि कसा केला पाहिजे या विषयी सगळ्यांना माहित नसतं. एवढंच काय तर या गोळ्यांचा शरीरावर काय परिणाम होतो हे देखील कोणाला माहित नसते. 

आणखी वाचा : 'हा मुलगा मोठा होऊन....', Sonam Kapoor च्या मुलाविषयी मोठी भविष्यवाणी आली समोर

मासिक पाळीदरम्यान वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांचे स्त्रियांच्या शरीरावर परिणाम होतात. स्त्रियांच्या शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टोरॉन असे दोन हार्मोन्स असतात. त्यावर पाळीचं चक्र आधारित असतं. पाळी उशिरा यावी म्हणून या हार्मोन्सच्याच गोळ्या घ्याव्या लागतात. या गोळ्या हार्मोन्सच्या नियमित सुरु असणाऱ्या चक्रावर परिणाम करतात. नैसर्गिकरित्या चालेलं पाळीचं चक्र पुढे -मागे केल्याने आपल्या शरिरावर अनेक वाईट परिणामही होऊ शकतात. एखाद्या महिलेनं या हार्मोन्सचं सातत्यानं अतिसेवन घेतल्यामुळे ब्रेन स्ट्रोक, पॅरालिसिस, फिट येणं अशा अनेक घटना पाहायला मिळतात. पाळी लांबवण्यासाठी बायका दहा ते पंधरा दिवस या गोळ्या घेत राहतात. त्याचा डोस जास्त झाल्यानं याचे परिणाम फार घातक असतात. (is it okay to get pills during menstrual period know the details women health news) 

आणखी वाचा : Kareena Kapoor पासून अनेक प्रसिद्ध अभिनेत्रीचे MMS झाले लीक

स्त्रिया अनेक वेळा या गोळ्या घेण्याआधी डॉक्टरांना विचारत नाहीत. या गोळ्या मेडिकल स्टोअरमध्ये सहज उपलब्ध असतात. त्यामुळे स्त्रिया त्यांना वाटेल तेव्हा त्या गोळ्या घेतात. पण या गोळ्या घेणाऱ्या पेशंटविषयी सगळं माहित असणं महत्त्वाचं असतं. एखाद्या स्त्रिला मायग्रेनचा त्रास असेल किंवा तिला आधी स्ट्रोक येऊन गेला असेल, हाय किंवा लो ब्लडप्रेशर असेल, तिचं वजन जास्त असेल तर या गोळ्यांचा त्या स्त्रिला त्रास होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)