Kangana Ranaut On Shahrukh Khan : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) त्याच्या 'पठाण' (Pathaan) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काल 25 जानेवारी रोजी 'पठाण' प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी प्रेक्षकांना वेड लावलं आहे. इतकंच काय तर चित्रपटानं दुसऱ्या दिवशी रेकॉर्ड तोड कमाई केली होती. पठाणनं आता पर्यंत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. आता या चित्रपटावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनं (Kangana Ranaut) तिची प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिनं हे सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगनानं हे ट्वीट तिच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केलं आहे. यावेळी अनेक लोक म्हणत आहेत की पठाणनंचा द्वेषावर प्रेमानं विजय... पण कोणचं प्रेम आणि कोणाचा द्वेष? यावर आधी स्पष्ट व्हा, कोण तिकिट विकत घेतय आणि कोणाला यश मिळतय? होय, हे भारताचे प्रेम आहे जिथे 80% हिंदू राहतात आणि इथे पठाण नावाचा चित्रपट बनवला जातो (ज्यात आपला शत्रू देश पाकिस्तान आणि ISIS दाखवले गेले होते आणि तो चित्रपट यशस्वी होत आहे, ही आपल्या भारताची भावना आहे जो द्वेष किंवा न्याय आहे. द्वेषावर आणि शत्रूंच्या घाणेरड्या राजकारणावर भारताचे प्रेम आहे. पण ज्या लोकांना मोठ्या आशा आहेत, त्यांना मी सांगू इच्छिते की पठाण हा फक्त एक चित्रपट असू शकतो, गुंजेगा तो यहाँ सिर्फ जय श्री राम, जय श्री राम.



‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच कंगनाने ट्विटरवर पुनरामन केलं होतं आणि त्यानंतर तिने संपूर्ण बॉलिवूडबाबत वक्तव्य केलं होतं. तर या आधी कंगनानं एका कार्यक्रमात ‘पठाण’बद्दल बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. शाहरुख खानच्या चित्रपटाचं कौतुक करताना कंगना म्हणाली, 'पठाण चित्रपट चांगला बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. असे चित्रपट चालायलाच हवेत आणि मला वाटतं आपली हिंदी चित्रपटसृष्टी मागच्या काही दिवसांपासून कुठेतरी मागे पडत होती. पण आता सगळेजण आपल्या पद्धतीने त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत.'


हेही वाचा : Pathaan Boxoffice Collection Day 1 : 'पठाण' चित्रपटानं इतक्या तासात केला 100 कोटींचा आकडा पार


दरम्यान शाहरुखा खानची मुख्या भूमिका असलेल्या या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone), जॉन अब्राहम (John Abraham) , डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) आणि आशुतोष राणा (Ashutosh Rana) यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्मची असून दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. काही रिपोर्ट्सनुसार या चित्रपटाने आतापर्यंत संपूर्ण देशभरात ५१ कोटींचा गल्ला जमवला असल्याचं बोललं जात आहे