IPL 2023: वामिकाचं नाव ऐकताच का भडकली Kangana Ranaut? झाप झाप झापलं अन्...
Vamika Virat Kohli: विराट अंकल, मी तुमच्या वामिकाला डेटवर नेऊ का? असा सवाल पोराने प्लेकार्डच्या माध्यमातून विचारण्यात आला होता. पोस्टरची चर्चा झाली. मात्र, अनेकांनी यावर टीका देखील केली आहे. त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) देखील चांगलीच भडकल्याचं दिसून आलं.
Kangana Ranaut On Vamika Kohli: आयपीएलच्या (IPL 2023) रंगतदार सामन्यांना बहर आल्याचं दिसत आहे. मागील काही सामने हायप्रोफाईल झाल्याने प्रेक्षकांची क्रेझ आणखीच वाढली आहे. त्यामुळे स्टेडियमवर देखील डोळ्यांदेखत सामना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. स्टेडियमवर अनेक प्रेक्षक प्लेकार्ड (IPL PlayCard) घेऊन येतात. त्यामुळे त्यांची सोशल मीडियावर चर्चा असते. नुकताच रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात एक सामना रंगला. मात्र चर्चा झाली ती एका बारकाल्या पोराची.
दोन दिवसांपूर्वी एक बारक्या पोराचं प्लेकार्ड व्हायरल झालं होतं. त्याने थेट विराट (Virat Kohli) आणि अनुष्काच्या (Anushka Sharma) मुलीला म्हणजेच वामिकाला (Vamika Kohli) डेटवर नेण्याची विचारणा केली होती. विराट अंकल, मी तुमच्या वामिकाला डेटवर नेऊ का? असा सवाल पोराने प्लेकार्डच्या माध्यमातून विचारण्यात आला होता. पोस्टरची चर्चा झाली मात्र, अनेकांनी यावर टीका देखील केली आहे. त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) देखील चांगलीच भडकल्याचं दिसून आलं.
काय म्हणाली Kangana Ranaut?
लहान मुलांना हे असं नको ते कशाला शिकवता? यामुळे तुम्ही मॉर्डन किंवा कूल सिद्ध होऊ शकत नाही तर अश्लील आणि मुर्ख दिसता, असं म्हणत कंगनाने झाप झाप झापल्याचं दिसून आलंय. हा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करत कंगनाने अशा गोष्टींना विरोध केला आहे. त्यामुळे आता कंगना (Kangana Ranaut) पुन्हा ट्रेंडमध्ये आल्याचं दिसून येतंय.
पाहा पोस्ट
दरम्यान, नुकतंच विराट आणि अनुष्काने महाकाल मंदिरात जाऊन दर्शन घेतलं होतं. दोघांच्या दर्शनाच्या फोटोंचं कंगनाने तोंडभरून कौतुक देखील केलं होतं. त्यानंतर आता कंगनाने पोस्ट करत अनेकांच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. नेटकऱ्यांनी देखील या पोस्टरवर ट्रोल केलंय. तुम्ही तुमच्या मुलांना कसे संस्कार देता? असा सवाल आता सोशल मीडियावर (Social Media) उपस्थित केला जात आहे.