मुंबई : अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) हृतिक रोशन (Hrithik Roshan) यांचा बहुचर्चित ‘विक्रम वेधा’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हृतिक आणि सैफ सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. नुकतीच चित्रपटाची टीम कपिल शर्माच्या कार्यक्रमात प्रमोशनसाठी गेली होती. यावेळी सैफ आणि राधिका आपटेची खिल्ली उडवण्यात आली आहे. 


आणखी वाचा : 'मस्तराम' मधील अभिनेत्रीचा बोल्ड लूक पाहून चाहते हैराण, पाहा व्हिडीओ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्यक्रमात कपिलनं सैफ अली खानला अनेक मजेदार प्रश्न विचारले. कपिलनं सैफला विचारलं, ‘तुझे या आधीचे चित्रपट पाहिले ज्यात तू काही ना काही पकडतो. भूत पोलीस चित्रपटात तू भूतांना पकडतो आहेस, बंटी बबली चित्रपटात खोट्या बंटी बबलीला पकडत होता. चित्रपटांमध्ये आम्ही पाहिले मात्र खऱ्या आयुष्यात जेव्हा तू तुझ्या फार्महाउसवर जातोस तिथे कोंबडी पकडण्यासाठी कोण ठेवले आहे’? सैफ लगेच उत्तर देत बोलतो ‘मी एक कोंबडा ठेवला आहे’. कपिलनं लगेच विचारलं, ‘या चित्रपटातदेखील कधी तू बंदूक पकडून आहेस कधी राधिकाला पकडून आहेस’, त्यावर सैफनं उत्तर दिलं की, ‘होय या चित्रपटात एक सीन आहे जिथे मी एका हातात बंदूक पकडली आहे तर दुसऱ्या हातात राधिकाला पकडले आहे.' सैफचं उत्तर ऐकताच तिथे उपस्थित असलेले सगळे प्रेक्षक हसू लागले. 


आणखी वाचा : लग्नाच्या काही महिन्यांनंतर पती नाही तर 'या' पुरुषासाठी ढसाढसा रडू लागली 'ही' अभिनेत्री!


चित्रपट 30 सप्टेंबरला प्रदर्शित झाला असून त्यानं पहिल्या दिवशी 10.50 कोटी रुपयांची कमाई केली. 'विक्रम वेधा' भारतात 4000 हून अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे, त्यामुळे हा एक मोठा चित्रपट म्हणता येईल. या चित्रपटात हृतिक आणि सैफ असे दोन टॉप स्टार्सही आहेत. अशा परिस्थितीत, ओपनिंगनुसार, 'विक्रम वेधा'ला बॉक्स ऑफिसवर हिट होण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. या चित्रपटाचे ओपनिंग वीकेंड कलेक्शन किती आहे हे पाहणं रंजक ठरणार आहे.


आणखी वाचा : लग्नाआधी अली फजल- रिचा चड्ढाच्या कॉकटेल पार्टीचे फोटो समोर!



आणखी वाचा : कॅमेऱ्यात कैद झाली कपिल शर्माची अशी चूक ज्यामुळे झाला ट्रोलिंगचा शिकार


चित्रपटात सैफ एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद यांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले असून, निर्मिती भूषण कुमार आणि एस. शशिकांत यांनी केली आहे. गुलशन कुमार, टी-सीरिज, रिलायन्स एन्टरटेन्मेंट, फ्रायडे फिल्मवर्क्स, जिओ स्टुडिओ आणि वायनॉट स्टुडिओज प्रोडक्शनच्या संयुक्त विद्यमाने हा चित्रपट प्रस्तुत केला जात आहे.