लग्नाच्या काही महिन्यांनंतर पती नाही तर 'या' पुरुषासाठी ढसाढसा रडू लागली 'ही' अभिनेत्री!

अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे. 

Updated: Oct 2, 2022, 11:43 AM IST
लग्नाच्या काही महिन्यांनंतर पती नाही तर 'या' पुरुषासाठी ढसाढसा रडू लागली 'ही' अभिनेत्री! title=

मुंबई :  जेव्हा एखादा अवॉर्ड शो असतो तेव्हा चाहत्यांच्या नजरा या शोजवर खिळलेल्या असतात. आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला कोणता पुरस्कार मिळणार हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं आहे. नुकत्याच पार पडलेल्या 'झी रिश्ते अवॉर्ड्स'मध्ये सेलिब्रिटींची जत्रा होती आणि या अवॉर्ड नाईटमध्ये एक अभिनेत्री खूप रडली. या अभिनेत्रीचं काही महिन्यांपूर्वीच लग्न झालं आहे आणि या अवॉर्ड नाईटमध्ये ती आपल्या पतीबद्दल नाही तर दुसऱ्या कोणत्या व्यक्तीविषयी बोलत रडत होती. अभिनेत्रीला पाहून सगळेच थक्क झाले.

आणखी वाचा : लग्नाआधी अली फजल- रिचा चड्ढाच्या कॉकटेल पार्टीचे फोटो समोर!

झी रिश्ते अवॉर्डने पुन्हा एकदा टीव्हीवर थैमान घातलं आहे. यावेळीही झी रिश्ते अवॉर्ड्समध्ये सर्व मालिकांचे स्टार्स पोहोचले होते. छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्रद्धा आर्याही तिच्या सुपरहिट मालिका 'कुंडली भाग्य'च्या (Kundali Bhagya) संपूर्ण टीमसोबत पोहोचली. मात्र, झी रिश्ते पुरस्कार सोहळ्यात श्रद्धा आर्या (Shraddha Arya)रडताना दिसली. लग्नानंतर पहिल्यांदाच श्रद्धा आर्या अशा प्रकारे रडताना दिसली आहे. अशा परिस्थितीत श्रद्धा आर्यचे चाहते चांगलेच नाराज होत आहेत. चाहत्यांना हे जाणून घ्यायचे आहे की श्रद्धा आर्या कशामुळे रडली?

आणखी वाचा : स्टेजवरील न्यूड मॉडेलला पाहून दोन पुरुषांनी केलं असं काही की पाहून तुम्हालाही बसेल धक्का!

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : '22 वर्षांनंतर पुरुषां इतकं...', प्रियांका चोप्राचं खळबळजनक वक्तव्य चर्चेत

झी रिश्ते अवॉर्ड्समध्ये श्रद्धा आर्य आणि शक्ती अरोरा यांना सर्वोत्कृष्ट जोडीचा पुरस्कार देण्यात आला. धीरज धूपरमुळे श्रद्धा आर्य रडू लागली हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. बोलता बोलता श्रद्धाला अचानक धीरज धुपारची आठवण झाली. श्रद्धाला रडताना पाहून शक्तीला धक्काच बसला. सर्वांसमोर शक्ती श्रद्धाला शांत करताना दिसला. श्रद्धा म्हणाली, काही काळापुर्वी आमची जोडी झाली आणि आम्हाला फेव्हरेट जोडीसाठी हा पुरस्कार का दिला जात आहे, असा प्रश्न मला क्षणभर पडला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा पुरस्कार शक्ती आणि श्रद्धाचा नसून करण आणि प्रीताचा आहे. हे बोलत असताना श्रद्धा आर्या ढसाढसा रडू लागली. (kundali bhagya actress shraddha arya cried after she received an award missed her co star dheeraj dhoopar) 

आणखी वाचा : कॅमेऱ्यात कैद झाली कपिल शर्माची अशी चूक ज्यामुळे झाला ट्रोलिंगचा शिकार

श्रद्धाला रडताना पाहून चाहत्यांचा अंदाज आहे की श्रद्धाला अजूनही तिचा कॉस्टार धीरज धूपरची आठवण येत आहे. मात्र, श्रद्धाप्रमाणेच चाहत्यांनाही प्रीता आणि करणची जुनी जोडी पुन्हा पाहण्याची इच्छा आहे. श्रद्धाला रडताना पाहून श्रद्धाला अजूनही तिचा कोस्टार धीरज धुपारची आठवण येत असल्याचा अंदाज चाहत्यांना आहे.