लग्नाआधी अली फजल- रिचा चड्ढाच्या कॉकटेल पार्टीचे फोटो समोर!

अली फजल आणि रिचा चड्ढा यांचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Updated: Oct 2, 2022, 10:50 AM IST
लग्नाआधी अली फजल- रिचा चड्ढाच्या कॉकटेल पार्टीचे फोटो समोर!

मुंबई : बॉलिवूड स्टार कपल अली फजल (Ali Fazal) आणि रिचा चढ्ढा (Richa Chadha) कायमचे एकमेकांचे होणार आहेत. दोघेही लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. यापूर्वी दिल्लीत प्री-वेडिंग फंक्शन्स होत आहेत. मेहंदी आणि संगीत सेरेमनीनंतर आता दोघांची कॉकटेल पार्टी आहे. या खास कार्यक्रमासाठी दोघांनीही पारंपरिक लूक निवडला. त्यांचे या कार्यक्रमातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत. 

आणखी वाचा : स्टेजवरील न्यूड मॉडेलला पाहून दोन पुरुषांनी केलं असं काही की पाहून तुम्हालाही बसेल धक्का!

रिचा सिक्वेन्स साडीत खूप सुंदर दिसत आहे तर अलीनं मल्टीकलर शेरवानी परिधान केली आहे. दोघांनी एकमेकांचा हात पकडून भरपूर पोज दिल्या. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहते या कपलवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. याआधी रिचा आणि अलीनं संगीत सेरेमनीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्याचे अनेक व्हिडिओही समोर आले आहेत. दोघांनीही त्यांच्या संगीत सेरेमनीमध्ये भरपूर डान्स केला.

आणखी वाचा : '22 वर्षांनंतर पुरुषां इतकं...', प्रियांका चोप्राचं खळबळजनक वक्तव्य चर्चेत

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रिचा चढ्ढा आणि अली फजलचा मेहंदी सेरेमनीही पार पडली. रिचानं इन्स्टाग्रामवर मेहंदी डिझाइनचा एक छोटासा व्हिडिओ शेअर केला होता. त्या मेहंदीत तिच्या नावाचं पहिलं अक्षर R आणि अलीच्या नावाचं पहिलं अक्षर A असे एकत्र करून बनवलेले खास डिझाइनही दिसत आहे. (Ali Fazal Richa Chadha Cocktail Party Before Wedding Traditional Looks Viral Watch Video )

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : कॅमेऱ्यात कैद झाली कपिल शर्माची अशी चूक ज्यामुळे झाला ट्रोलिंगचा शिकार

दिल्लीत लग्न झाल्यानंतर रिचा आणि अली मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टी देणार आहेत. या पार्टीत बॉलिवूडचे सर्व प्रसिद्ध सेलिब्रिटी उपस्थित राहू शकतात. रिचा आणि अली गेल्या 10 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांची भेट 'फुकरे' सेटवर झाली होती.