मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनन्याने दाक्षिणात्य अभिनेता विजय देवकोंडासोबत करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ७’मध्ये हजेरी लावली होती. या आधी अनन्या पांडे मागच्या काही काळापासून तिच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे चर्चेत आहे. करण जोहरच्या शोमध्ये अनन्यानं तिच्या डेटिंग लाइफबद्दल बिनधास्त गप्पा मारल्या आणि त्यासोबत अनेक कलाकारांच्या डेटिंग लाइफविषयी खुलासा केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘लायगर’ सह-कलाकार विजय देवरकोंडा बद्दल विचारले असता, अनन्या म्हणाली, "तो घाईत आहे... मिका सिंगला भेटण्यासाठी घाई करत आहे." अनन्याच्या उत्तरानं रश्मिका मंदाना असल्याचा इशारा दिला आहे. रश्मिका आणि विजय रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अनन्याचं उत्तर ऐकताच विजय म्हणाला, 'तुला खरंच असं वाटतं?'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


टायगर श्रॉफच्या रिलेशनशिपविषयी बोलता अनन्या म्हणाली. त्याला त्याची दिशा माहित आहे. जान्हवी विषयी विचारता, ती सिंगल प्रिंगल आहे, असे अनन्या म्हणाली. कियारा आडवाणीच्या रिलेशनशिपविषयी विचारता अनन्या म्हणाली, 'Her raatans are very lambiyan'. अनन्याने शेरशाह चित्रपटातील राता लंबिया हे गाण्याची हिंट दिली, याच चित्रपटात कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिका साकारत आहेत. पुढे मस्करी करत अनन्या म्हणाली, 'वेक अप सिड'


शो दरम्यान विजयला रश्मिकासोबत रिलेशनशिपमध्ये आहे का असा प्रश्न विचारता अभिनेता म्हणाला, 'आम्ही एकत्र 2 चित्रपट केले आहेत आणि ती एक डार्लिंग आहे. मला ती खूप आवडते. ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि आम्ही चित्रपटांविषयी चर्चा करतो आणि एकमेकांसोबत अनेक गोष्टी शेअर करतो. चित्रपटांमध्ये, आपण खूप वेळ एकत्र असतो म्हणून आपण जवळ येतो आणि त्यामुळे एक बॉन्ड खूप लवकर तयार होतो." त्याच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल विचारले असता, विजय म्हणाला, "माझे आई-वडील आणि दिग्दर्शक पुरी यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत."


करण जोहरच्या शोमध्ये कलाकार आपले खासगी आयुष्य, प्रेम आणि जवळच्या मित्रांशी संबंधीत खुलासे करताना दिसतात. विशेषतः करणच्या शोमध्ये अनेकदा खासगी आयुष्याबद्दल बरेच खुलासे होतात. 7 व्या सीझनमध्येही आतापर्यंत अक्षय कुमार, सारा अली खान, जान्हवी कपूर आणि समंथा सारख्या कलाकारांनी हजेरी लावली आहे आणि त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.