Hardik Pandya Dance on Gulabi Sadi : सोशल मीडियावर कधी काय ट्रेंड होईल, काहीही सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर एक गाणे तुफान व्हायरल होताना दिसत आहे. संजू राठोड व प्राजक्ता घाग यांच्या ‘गुलाबी साडी’ (Gulabi Sadi Song) या गाण्याने वेडं लावलं आहे. या गाण्यावर सेलिब्रेटींपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वजण रील्स बनवताना दिसत आहेत. माधुरी दीक्षित, रेमो डिसुझा, किली पॉल यांच्यापाठोपाठ आता मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनाही या गाण्याची भूरळ पडली आहे. सध्या सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) खेळाडूंचा या गाण्यावरील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 


हार्दिक पांड्याचा मजेशीर डान्स 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'फोकस  इंडियन' या इन्स्टाग्राम पेजने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत इन्फ्लूएन्सर करण सोनावणे हा 'गुलाबी साडी' या गाण्यावर रील करताना दिसत आहे. यात तो एका स्टेडिअमवर गुलाबी रंगाचा स्कार्फ घालून नाचताना दिसत आहे. त्याच्यासोबत मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याही डान्स (Hardik Pandya Dance) करत असल्याचे दिसत आहे. 


आणखी वाचा : IPL 2024 Jersey: नवा हंगाम, नवी जर्सी; पाहा सर्व टीमचा नवा अंदाज



रोहित शर्मा का नाही? अनेकांना प्रश्न


विशेष म्हणजे यात हार्दिक हा वहिनी थोडसं क्रिकेट खेळणार का? असा प्रश्नही मस्करीत विचारताना दिसत आहे. या व्हिडीओत ईशान किशन, हार्दिक पांड्या, टिम दविड, डेवाल्ड ब्रेविस हे क्रिकेटपटू ‘गुलाबी साडी’ या गाण्यावर थिरकत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओत रोहित शर्मा का नाही? असा प्रश्नही अनेकांनी विचारला जात आहे. त्यावर फोकस इंडियन या पेजवरुन "तो खूप लाजत होता", अशी कमेंट करण्यात आली आहे. 



आणखी वाचा : भारतीय क्रिकेट इतिहासातील काळा दिवस! IPL मध्ये ऑरीची कॉमेन्ट्री पाहून नेटकरी संतप्त


दरम्यान गुलाबी साडी या गाण्याचे लेखन संजू राठोड यांनी केले आहे. त्यानेच हे गाणे गायलं आहे. हे गाणे 6 फेब्रुवारी 2024 रोजी प्रदर्शित झाले. या गाण्याला 18 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. संजू राठोड याने याआधी 'नऊवारी साडी' हे गाणे गायले होते. या गाण्याला युट्यूबवर लाखो Views मिळाले होते.