नागा चैतन्यच्या लग्नात त्याची आईच होती गैरहजर? कोण आहे नागार्जुनची पहिली पत्नी?
Nagarjunas first wife: नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला लग्नाच्या बेडित अडकले आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंदली आहे.
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नाचे फोटो व व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. त्यातच आता नागार्जुन आणि त्याची पहिली पत्नी लक्ष्मी दुगुबत्ती यांच्याही लग्नाचे फोटो समोर आले आहेत. नागा चैतन्यच्या दुसऱ्या लग्नात त्याची आई उपस्थित नसल्याने सोशल मीडियावर अनेक तर्क वितर्काना उधाण आलं आहे. नाहा चैतन्यची आई कोण आहे असा सवाल नेटिजन्स करत आहेत. तर जाणून घेऊया नागार्जुनच्या पहिल्या पत्नीविषयी.
लक्ष्मी दुगुबत्ती या नागार्जुनच्या पहिल्या पत्नी आहेत. मात्र, नागा चैतन्यच्या जन्मानंतर दोघही वेगळे झाले. नंतर नागार्जुनने अभिनेत्री अमला मुखर्जी यांच्यासोबत १९९२ मध्ये दुसरं लग्न केले. त्यांचा एक मुलगीदेखील आहे. अखिल अक्किनेनी हा नागा चैतन्यला सावत्र भाऊ आहे.
कोण आहे लक्ष्मी दुगुबत्ती?
लक्ष्मी दुगुबत्ती या डी रामानायडू आणि राजेश्वरी यांची मुलगी आहेत. दुगुबत्ती रामानायडु हे भारतीय चित्रपट निर्माते आहेत. तसंच, सुरेश प्रोडक्शनचे सर्वेसर्वा आहेत. लक्ष्मी यांना दोन भावंड आहे. व्यंकटेश आणि सुरेश बाबू. लक्ष्मी या बाहुबली फेम राणा दुगुबत्तीच्या आत्या आहे. मम्हणजेच नागा चैतन्य आणि राणा दुगुबत्ती हे दोघ चुलत भावंड आहेत.
नागार्जुन यांच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर लक्ष्मी यांनी सारनाथ यांच्यासोबत लग्न केले. ते एक बिझनेसमॅन आहेत. तसंच, दोघंही सध्या अमेरिकेत असतात. तिथे लक्ष्मी यांनी स्वतःचा बिझनेस सुरू केला असून त्याला लक्ष्मी इंटिरेअर असं नाव दिलं आहे. लक्ष्मी या नागा चैतन्यच्या साखरपुड्यात उपस्थित होत्या. मात्र, लग्नात त्या कुठेच दिसत नव्हत्या.
दरम्यान, लक्ष्मी यांच्या दुसर्या लग्नाबाबत चैतन्यची परवानगी नव्हती त्यामुळं तो त्यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जातं होतं. मात्र, अभिनेत्यानं एकदा एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं की, या अफवा असून यात काहीच सत्य नाही.सध्या मी हैदराबादमध्ये कामाच्या निमित्ताने व्यस्त आहे मात्र, अमेरिकेत गेल्यानंतर मी आईला भेटतो, असं त्याने म्हटलं होतं.
समंथा रुथ प्रभूसोबत घटस्फोट झाल्यानंतर नागा चैतन्य याने शोभितासोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. बुधवारी 4 डिसेंबर 2024 मध्ये त्यांना लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.