`डोकं खराब केलंय, तुम्ही लोक...`; सेल्फी काढण्यासाठी आलेल्या चाहत्यांवर संतापले नसीरुद्दीन शाह
Naseeruddin Shah : नसीरुद्दीन शाह यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सगळीकडे त्यांचीच चर्चा सुरु आहे.
Naseeruddin Shah : बॉलिवूड अभिनेता नसीरुद्दीन शाह हे नेहमीच त्यांच्या स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या मुलाखती या नेहमीच चर्चेत राहतात. तर नसीरुद्दीन शाह हे वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट करताना दिसतात. ते सध्या 'शोटाइम' या सीरिजला घेऊन चर्चेत आहेत. नुकताच त्यांच्या एक व्हिडीओ व्हायरल झाला असून चाहत्यांवर ते ओरडले आहेत. सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतंय. ते खूप कमी वेळा एअरपोर्टवर दिसतात. जेव्हा ते विमानतळावर दिसले तेव्हा त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली. तर नसीरुद्दीन शाह हे थेट चाहत्यांवर चिडले.
नसीरुद्दीन यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओत नसीरुद्दीन शाह हे विमानतळावर असल्याचे पाहायला मिळते. एकीकडे पापाराझी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक करत असतात. तर दुसरीकडे त्यांचे चाहते त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी चाहते त्यांच्या मागे फिरत असतात. तर नसीरुद्दीन त्यासाठी तयार नसतात. तर व्हिडीओत ते ओरडताना दिसत आहेत. तुम्ही खूप चुकीचं काम केलं. डोकं फिरवलं तुम्ही. तुम्ही लोकांना एकदापण सोडत नाही. तुम्हाला कळत कसं नाही. त्यानंतर व्हिडीओच्या मागून एक आवाज येतो की राहु द्या, काही करू नका. त्यांनी नाही सांगितलं कर नका करू.'
हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी नसीरुद्दीन शाह यांना 'रागीट व्यक्ती' म्हणाला आहे. दुसरी नेटकरी म्हणाला, 'वय वाढल्यावर लोक असे करतात.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'चेहरा चांगला नाही, तर बोला तरी नीट.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'असा अॅटिट्यूड मुळीच ठेवणं चांगलं नाही.' तर काही नेटकऱ्यांनी त्यांची बाजू घेत म्हटलं की 'त्यांच्या वाढत्या वयाचा हा परिणाम आहे आणि अशा परिस्थितीत त्यांना एकटं सोडायला हवं.' त्यांनी सांगितलं की 'नसीरुद्दीन चांगले कलाकार आहेत आणि त्यांनी कधीच लोकप्रियता मिळवण्यासाठी काही केलेलं नाही. ते कोणतीच गोष्ट फेम मिळण्यासाठी करत नाहीत.'
हेही वाचा : खरंच रणबीर सिक्रेट अकाऊंटवरुन सोशल मीडियावर सक्रीय? ओळख लपवून ठेवतोय बॉलिवूडवर नजर
नसीरुद्दीन शाह यांच्या सीरिजविषयी बोलायचे झाले तर ते 'शोटाइम' या सीरिजमध्ये दिसणार आहेत. ही सीरिज 8 मार्च रोजी डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.