आई दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याचे कळताच 15 वर्षीय Palak Tiwari ला बसला होता धक्का, म्हणाली `मला कोणी...`
Palak Tiwari On Mother Shweta Pregnanat For the Second Time : पलक तिवारीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. वयाच्या 15 व्या वर्षी पलक तिच्या कुटुंबात कोणी नवीन सदस्य येईल याविषयी ऐकताच तिला कसं वाटलं याविषयी सांगितलं आहे.
Palak Tiwari On Mother Shweta Pregnanat For the Second Time : श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी तिच्या किसी का भाई किसी की जान चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून पलकनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. काही दिवसांपूर्वी पलकनं सलमान खानच्या सेटवर मुलींसाठी असलेल्या नियमांविषयी सांगितले होते. आता पलक तिची आई श्वेताच्या दुसऱ्या प्रेग्नंसी विषयी केलेल्या एका वक्तव्यावर बोलली आहे. पलक 15 वर्षांची असताना तिची आई श्वेता ही प्रेग्नंट होती. तेव्हा आईनं दिलेल्या या बातमीनं पलकला खूप वाईट वाटलं होतं.
आई श्वेता तिवारी दुसऱ्यांदा आई होणार आहे हे कळल्यावर पलकला कसं वाटलं होतं, याचा खुलासा पलकने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखती केला आहे. पलकनं सांगितलं की जेव्हा तिला पहिल्यांदा तिच्या आईच्या दुसऱ्या गरोदरपणाबद्दल कळालं तेव्हा तिला काहीच समजलं नव्हतं. पलकनं ही मुलाखत नुकतीच ‘फिल्म कंपेनियन’ला दिली होती. यावेळी पलक म्हणाली, 'मला आठवतंय त्यावेळी मी 15 वर्षांची होते. माझी आई मला म्हणाली, आम्हाला बाळ होणार आहे. तर मी मान हलवत ‘नाही, नाही, नाही’ असं म्हणाले. तू नाही का म्हणतेस, असं आईने मला विचारलं. त्यावर मी म्हणाले, मी नवीन मेंबर आपल्या कुटुंबात येण्यासाठी तयार नव्हते. मला कुणीच सांगितलं नाही. माझं वागणं पाहून आई म्हणाली ‘तुझी ओव्हरअॅक्टिंग बंद कर.'
श्वेताविषयी बोलायचे झाले तर तिचं दोनवेळा लग्न झालं आहे. श्वेता तिवारीनं 1998 साली राजा चौधरीशी लग्न केलं होतं. लग्नाच्या दोन वर्षात म्हणजेच 2000 मध्ये पलकचा जन्म झाला. श्वेता आणि राजा चौधरीचा 2012 साली घटस्फोट झाला. त्यानंतर 2013 साली पलकनं अभिनव कोहलीशी लग्न केलं. लग्नाच्या बाबतीत श्वेता ही अपयशी ठरली. तिचं दुसरं लग्न देखील फक्त 9 वर्षे टिकलं आणि श्वेतानं 2022 साली अभिनवशी घटस्फोट घेतला. एक सिंगल मदर म्हणून श्वेता आता पलक आणि रेयांश अशा तिच्या दोन्ही मुलांचा सांभाळ करत आहे.
हेही वाचा : 'डांबुन ठेवलं, जेवणही दिलं नाही...', पाकिस्तान बॉर्डरजवळ मराठी कलाकारांसोबत घडला धक्कादायक प्रकार
दरम्यान, श्वेताला कसौटी जिंदगी की या मालिकेतून लोकप्रियता मिळाली. या मालिकेत श्वेतानं प्रेरणाची भूमिका साकारली आहे. श्वेता आणि पलक सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्या दोघी फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. त्या दोघांचे फोटो पाहिले की लोक त्यांना कमेंट करत बहिणी असल्याचे बोलतात. त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात.