'डांबुन ठेवलं, जेवणही दिलं नाही...', पाकिस्तान बॉर्डरजवळ मराठी कलाकारांसोबत घडला धक्कादायक प्रकार

Baloch Team Horrifying Experience : 'बलोच' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान संपूर्ण टीमला खूप मोठा आणि अनपेक्षित गोष्टीला तोंड द्यावे लागले. या चित्रपटाचा सहनिर्माता आणि अभिनेता अमोल कांगणेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: May 5, 2023, 04:47 PM IST
'डांबुन ठेवलं, जेवणही दिलं नाही...', पाकिस्तान बॉर्डरजवळ मराठी कलाकारांसोबत घडला धक्कादायक प्रकार title=
(Photo Credit : Social Media)

Baloch : गेल्या अनेक दिवसांपासून प्रवीण तरडे यांचा 'बलोच' हा चित्रपट चर्चेत आहे. आज 5 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची पटकथा ही पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांवर आधारीत आहे. आपण इतिहासाचा एक भाग मोठ्या पडद्यावर दाखवणार आहोत, हे जेव्हा ठरवतो तेव्हा आपण अनेक गोष्टींचा विचार करतो आणि वेगवेगळ्या पद्धतीनं भूमिकेसाठी तयारी करतो.  इतकंच काय तर अनेकवेशळा चित्रपटाचं शूटिंग करताना अडचणींचा सामना देखील करावा लागतो. आता चित्रपटाच्या टीमनं त्यांना या चित्रपटाची शूटिंग करताना आलेला एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे. गावकऱ्यांनी या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला एका खोलीत डांबून ठेवलं होतं. याचा खुलासा चित्रपटाचा सहनिर्माता आणि अभिनेता अमोल कांगणे याने केला आहे.

बलोच या चित्रपटानं नुकतीच ‘महाराष्ट्र टाइम्स’ला मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी सांगितलं की शूटिंग दरम्यान, कशा प्रकारे गावकरी त्यांच्यावर नाराज झाले आणि त्यानंतर त्यांनी संपूर्ण टीमला एका खोलित बंद करून दोन दिवस डांबून ठेवलं होतं. अमोल म्हणाला, 'जैसलमेरमध्ये आम्ही राहायला होतो. जैसलमेर पासून 60 ते 70 किलोमीटर पुढे पाकिस्तान बॉर्डरवर खुर्जी म्हणून गाव आहे तिथे आम्ही शूटिंग करीत होतो. चार-पाच दिवस आमचे शूटिंग सुरू होते. प्रवीण सर तिथले शूटिंग संपायच्या एक दिवस आधीच मुंबईला गेले आणि दुसऱ्या दिवशी माझे, स्मिता मॅमचे आणि अशोक समर्थ सरांचे शूटिंग होते. ते शूटिंग सुरू असताना आमची टीम आणि तेथील स्थानिक प्रोडक्शन यांच्यात काही कारणांमुळे वाद झाले. त्यांना आमचा इतका राग आला की त्यांनी आम्हाला तिथे डांबून ठेवले.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे याविषयी सविस्तर बोलताना अमोल म्हणाला, 'तिथल्या लोकांना फार राग आला होता, त्यामुळे थेट ते सेटवर आले आणि आम्हाला म्हणाले, शूटिंग ताबडतोब थांबवा आणि इथून निघून जा. त्यानंतर त्यांनी आम्हाला तिथे दोन दिवस डांबून ठेवलं. अखेर आम्ही पुण्याच्या पोलीस कमिशनरांना फोन केला आणि त्यांना सगळे सांगितले. नंतर त्या पोलीस कमिशनर यांनी जैसलमेरमधील कमिशनर यांना फोन केला. त्यानंतर त्या गावकऱ्यांनी आमच्याकडे तब्बल 2 कोटींची मागणी केली. पैसे दिले नाहीत तर इथून शूटिंग करून जाता येणार नाही, असे सांगितले. एका तांत्रिक गडबडीमुळे त्यांच्या मनात आमच्याबद्दल गैरसमज निर्माण झाले आणि ते सगळं वाढत गेलं.' 

हेही वाचा : Fact Check : अभिषेक - ऐश्वर्याचं लग्न थांबवण्यासाठी जान्हवी कपूरनं केलेला स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न?

पुढे अमोल म्हणाला, 'त्या दोन दिवसांमध्ये त्या गावकऱ्यांनी आमच्या गाड्यांच्या टायरची हवा काढली होती. अखेर त्यांनी मला, स्मिता मॅमला आणि अशोक समर्थ सरांना आम्ही प्रमुख कलाकार असल्याने गाडी दिली आणि तिथून निघण्याची परवानगी दिली. पण बाकी आमची संपूर्ण टीम मागे राहिली होती. त्या गावकऱ्यांनी टीमला जेवायलाही दिले नाही. अखेर आमचे निर्माते आणि पोलीस यांनी मिळून गावकऱ्यांची समजूत काढली आणि त्यांना 60 लाख रुपये देऊन हे प्रकरण मिटवले.'