Prajakta Mali : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत प्राजक्ता चाहत्यांच्या संपर्कात राहते. प्राजक्ताचे लाखो चाहते आहेत. तिचे फोटो आणि व्हिडीओ हे नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे आपण पाहतो. दरम्यान, नुकतीच प्राजक्तानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून चर्चेचा विषय ठरली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राजक्ता माळीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्राजक्तानं तीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमधून एक गोष्ट स्पष्ट होत आहे ती म्हणजे पुण्यातील आर्ट ऑफ लिव्हींगचा आश्रमात प्राजक्ता पोहोचली आहे. तर एका फोटोत प्राजक्ता निसर्ग दाखवताना दिसते. प्राजक्तानं पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि हिरव्या रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. हे फोटो शेअर करत प्राजक्तानं कॅप्शन दिलं की "आयूष्यात कितीही घरं-दारं झाली; तरी आर्ट ॲाफ लिव्हींग चं आश्रम माझं सगळ्यात आवडतं ठिकाण होतं, आहे आणि असेल". कधीही आश्रमवासी होऊ शकते... #गुरूतत्व #सानिध्य #ध्यान #योगी #शांती  अॅडव्हान्स कोर्स, डिटॉक्स मोड ऑन, फोन बंद असेल. # मौनव्रत #त्रिवेणीआश्रम."



प्राजक्ता माळीची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. प्राजक्ताची पोस्ट पाहता त्यावर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, "यात खरंच काहीही शंका नाही. सगळं जग विसरल्यासारखे होते आपल्या आश्रमात गेल्यावर." दुसरा नेटकरी म्हणाला, "मी पण लवकरच ट्राय करून बघणार आहे आर्ट ऑफ लिव्हिंग." तिसरा नेटकरी म्हणाला, "खरंच योग्य म्हणालीस, सायलेन्स आणि सेल्फी डिस्कव्हरीच्या खूप खूप शुभेच्छा." आणखी एक नेटकरी म्हणाला, "तिथे स्वर्ग आहे... आनंद आहे तिथे. दुसरा नेटकरी म्हणाला, "प्राजक्ता तू हा खूप चांगला मेसेज दिला आहेस आताच्या पिढीला."


हेही वाचा : Mahesh Babu नं शेअर केली लेक सिताराची शॉर्ट फिल्म!


दरम्यान, प्राजक्तानं काही दिवसांपूर्वीच एक फार्महाऊस खरेदी केले. त्याचे काही फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोमध्ये डोगर परिसरात असलेलं तिचं हे फार्महाऊस दिसत आहे. तर हे फोटो शेअर करत स्वप्न साकार असं म्हटलं होतं.