Mahesh Babu नं शेअर केली लेक सिताराची शॉर्ट फिल्म!

Sitaara Short Film : महेश बाबूनं लेकीच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी ही शॉर्ट फिल्म शेअर केली होती. सिताराची ही शॉर्ट फिल्म एका ज्वेलरीच्या ब्रॅंडसाठी करण्यात आली होती. महेश बाबूनं शेअर केलेली ही शॉर्ट फिल्म सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

दिक्षा पाटील | Updated: Jul 21, 2023, 03:07 PM IST
Mahesh Babu नं शेअर केली लेक सिताराची शॉर्ट फिल्म!  title=
(Photo Credit : Social Media)

Sitaara Short Film : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू आणि त्याची पत्नी नम्रता शिरोडकर हे त्यांची मुलगी सितारासाठी खूप आनंदीत आहेत. सिताराचा काल 20 जुलै रोजी वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तिच्या चाहत्यांपासून सगळ्यांनीच तिला शुभेच्छा दिल्या. या सगळ्यात नम्रता आणि महेश बाबू यांच्या शुभेच्छा हटके ठरल्या. यावेळी सितारानं तिच्या वाढदिवसानिमित्तानं शाळेतील मुलींना सायकल भेट म्हणून दिल्या. जेणे करून त्या मुलींना शाळेत जाणयला आवडेल आणि त्यातून त्यांना आनंद होईल. 

महेश बाबूनं सिताराच्या वाढदिवसानिमित्तानं तिचा एक फोटो शेअर करत 11 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझी स्टार!!! तू जे मनात ठरवलं आहेस ते सगळं तुला मिळो.  तर नम्रतानं देखील सिताराचा पीएनजी ज्वेलर्सच्या फोटो शूटमधील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत नम्रतानं हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. हा फोटो शेअर करत नम्रता म्हणाली, आणखी एक वर्ष मोठी झालीस, पण नेहमीच माझी बेबी गर्ल राहशील. आजचा दिवस तुझ्यासाठी आहे आणि तू जो आनंद आमच्यासोबत शेअर करते त्यासाठी. वाढदिवसाच्या शुभेच्छा सितारा!!! 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सिताराच्या वाढदिवसाच्या आधल्या दिवशी महेश बाबूनं सिताराची प्रिन्सेस ही शॉर्ट फिल्म शेअर केली आहे. टॅलेन्टेड सितारावर खूप खूप खूप अभिमान आहे. तर या शॉर्ट फिल्ममध्ये सितारा एक मॉर्डन मुलीच्या भूमिकात दिसते. ज्या मुलीला तिची आजी जबरदस्ती ज्वेलरीच्या दुकानात घेऊन जाते. कारण त्यांनी तिच्या हार्फ सारी सेरेमनी म्हणजेच (मुलगी वयात आली यासाठी एक कार्यक्रम करण्यात येतो तो) आणि ते तिला आवडतं नसतं. अखेर ती जेव्हा ते दागिने परिधान करते तेव्हा ती खरंच एका प्रिन्सेस सारखी दिसू लागते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : लेकीच्या जन्मानंतरची राम चरणची पहिली प्रतिक्रिया; असं काही केलं की पत्नीही भावूक...पाहा Video

सितारानं टाइम्स स्क्वेअरवर झळकत अनेक स्टारकिड्सला मागे टाकले आहे त्यात सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांची देखील नावं आहेत. महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर हे 2005 मध्ये लग्न बंधनात अडकले होते. त्यांना एक मुलगा असून गौतम असे त्याचे नाव आहे. तर तो 16 वर्षांचा आहे. सिताराही त्यांची दुसरी मुलगी आहे. सितारानं महेश बाबूच्या सरकारू वारी पाता या चित्रपटाती पेन्नी या गाण्यातून अभिनयात पदार्पण केले आहे. सिताराला अभिनय क्षेत्रातच करिअर करायचं आहे. तर गौतम देखील लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार अशी आशा चाहत्यांना आहे.