Priyanka Chopra : अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) भारतातच नाही तर जगात स्वत:चे अस्तित्व निर्माण केले आहे. प्रियांका भारतात चक्क तीन वर्षांनंतर परतली आहे. भारतात येताच तिनं तिच्या सोशल मीडियावरुन अनेक फोटो शेअर करत भारतासाठी असलेलं प्रेम जाहीर केले. ती तिच्या सोशल मीडियावरुन मुंबईतल्या अनेक प्रसिद्ध ठिकाणचे फोटो शेअर करत सगळ्यांनाच अचंबित करत आहे. तिचे हे फोटो आणि व्हिडिओ पाहून अनेक चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. (Priyanka Chopra spends quality time with daughter have you seen Photo nz)


हे ही वाचा - प्रियंका चोप्राने भारतात येताच केलं 'हे' काम, पाहा VIDEO


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


अभिनेत्रीने नुकतीच मुंबई आणि दिल्लीला भेट दिली. राज्यातील मुलींवरील हिंसाचार आणि भेदभाव संपवण्यासाठी ती उत्तर प्रदेशमध्ये युनिसेफच्या फील्ड ट्रिपसाठीही गेली होती. त्याच वेळी, तिच्या नवीनतम फोटोमध्ये, ती मुलगी मालती मेरी चोप्रा आणि पती निक जोनाससोबत क्वलिटी टाईम घालवताना दिसत आहे. फोटोमध्ये प्रियांका चोप्रा आपली मुलगी आणि पतीसोबत फरशीवर आराम करताना दिसत आहे. फोटोसोबत तिनं होम असे कॅप्शन लिहिले आहे.


हे ही वाचा - बॉलिवूडमधील या कपलच्या घरी पहिल्यांदाच मुलीचा जन्म झाला... जाणून घ्या



फोटोमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की ती तिच्या मुलीला अंगावर घेऊन खेळवताना दिसत आहे आणि सोबत तिचा पती निक जोनास देखील आहे. फोटोत तिघेही खूप क्यूट दिसत आहेत. फोटोत त्यांची मुलगी मालतीचा चेहरा दिसत नसला तरी. प्रियांका चोप्रा दररोज तिच्या मुलीचा फोटो शेअर करत असते, मात्र त्या फोटोमध्ये तिच्या मुलीचा चेहरा लपवून ठेवते.


 



 


हे ही वाचा - आलिया भट्टसाठी 2022 हे वर्ष ठरलं 'लकी'... जाणून घ्या एका क्लिकवर



प्रियांका चोप्रा पुढील प्रोजेक्टमध्ये कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत फरहान अख्तरच्या आगामी चित्रपट झी ले जरा मध्ये दिसणार आहे. त्याच्याकडे सिटाडेल ही वेब सिरीज देखील आहे, ज्याची निर्मिती दिग्दर्शक-अँथनी रुसो आणि रुसो यांनी केली आहे. प्रियांका हॉलिवूड चित्रपट लव्ह अगेनमध्येही दिसणार आहे.