प्रियंका चोप्राने भारतात येताच केलं 'हे' काम, पाहा VIDEO

अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) भारतातच नाही तर जगात स्वत:चे अस्तित्व निर्माण केले आहे. 

Updated: Nov 7, 2022, 05:09 PM IST
प्रियंका चोप्राने भारतात येताच केलं 'हे' काम, पाहा VIDEO title=
Priyanka Chopra did this thing as soon as she came to India watch the video nz

नवी दिल्ली : अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) भारतातच नाही तर जगात स्वत:चे अस्तित्व निर्माण केले आहे. प्रियांकाला कोविडपासून भारतात पाहायला मिळाले नव्हते. पण चक्क तीन वर्षांनंतर प्रियांका चोप्रा भारतात परतली आहे. भारतात येताच तिनं तिच्या सोशल मीडियावरुन अनेक फोटो शेअर करत भारतासाठी असलेलं प्रेम जाहीर केले. ती तिच्या सोशल मीडियावरुन मुंबईतल्या अनेक प्रसिद्ध ठिकाणचे फोटो शेअर करत सगळ्यांनाच अचंबित करत आहे. तिचे हे फोटो आणि व्हिडिओ पाहून अनेक चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. (Priyanka Chopra did this thing as soon as she came to India watch the video nz)

हे ही वाचा - आर्यन खान आणि अनन्या पांडेचा लिपलॉक फोटो समोर; जाणून घ्या व्हायरल फोटोमागचं सत्य

सध्या प्रियांका चोप्रा लखनऊमध्ये आहे. अभिनेत्रीने नुकतीच मुंबई आणि दिल्लीला भेट दिली. आपल्या सगळ्यांना तर माहितच असेल की प्रियांका सामाजिक कार्यांमध्ये अग्रेसर असते. तिनं भारतात येताच युनिसेफला भेट दिली. राज्यातील मुलींवरील हिंसाचार आणि भेदभाव संपवण्यासाठी ती उत्तर प्रदेशमध्ये युनिसेफच्या विविध केंद्रांना भेट देत होती. त्या दरम्यान कारमधून स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला. भेटीत तिने पारंपरिक चिकनकारी ड्रेस परिधान केला होता.

हे ही वाचा - आतापर्यंत कधीही पाहिला नसेल Hina Khan चा असा बोल्ड लूक

व्हिडिओमध्ये प्रियांकाने सांगितले की, भारतात लैंगिक असमानतेमुळे विशेषत: मुलींना असमान संधी मिळतात. तिने तिच्या बालपणात लखनौमध्ये शिक्षण घेतले, आजही शहरात राहणारे कुटुंब आणि मित्रांसोबत घालवलेल्या दिवसांची आठवण करून देत तिने सांगितले की, तिच्या काळापासून शहर आणि राज्याने तिच्यात काय बदल घडवून आणले आहेत हे मला पाहायचे आहे.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

 

हे ही वाचा - Srushti Tawade Rap : सृष्टी तावडेच्या रॅपने सर्वसामान्य महिलांना मिळालं बळ, जाणून घ्या

ती म्हणाली, "सध्या मी युनिसेफसोबत लखनौ, भारतामध्ये आहे. मी माझ्या बालपणीची काही वर्षे लखनऊमध्ये शाळेत घालवली आहेत. अभिनेत्रीने पुढे उत्तर प्रदेशातील मुलींवरील हिंसाचार आणि भेदभाव संपुष्टात आणण्यासाठी यावर उपाय शोधणार असल्याचे  प्रियांका व्हिडिओमध्ये म्हणाली, "आम्ही युनिसेफच्या वेगवेगळ्या भागीदारांकडे जात आहोत आणि मुलींवरील हिंसाचार आणि भेदभाव संपवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. दैनंदिन जीवनात त्यांना येणाऱ्या आव्हानांबद्दल मी ऐकेन आणि त्यावर उपाय शोधेन, कारण उपायांची मोठ्या प्रमाणावर गरज आहे.

हे ही वाचा - viral:Airport वर रितेश आणि मुलांना सोडताना जेनेलिया झाली भावुक..नेटकरी देताहेत प्रतिक्रिया

प्रियांका चोप्रा पुढील प्रोजेक्टमध्ये कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत फरहान अख्तरच्या आगामी चित्रपट झी ले जरा मध्ये दिसणार आहे. त्याच्याकडे सिटाडेल ही वेब सिरीज देखील आहे, ज्याची निर्मिती दिग्दर्शक-अँथनी रुसो आणि रुसो यांनी केली आहे. प्रियांका हॉलिवूड चित्रपट लव्ह अगेनमध्येही दिसणार आहे.