Rajpal Yadav Haircut: अभिनेते आणि अभिनेत्री यांना आपल्या भुमिकांसाठी फार मेहनत घ्यावी लागते मग ती मेहनत कपड्यांच्या बाबतीत असो वा अभिनयाच्या बाबतीत. परंतु कधीकधी कलाकारांना इतका जुगाड करावा लागतो की काही विचारू नका. अभिनेता राजपाल यादवचीही अशीच काहीतरी गत झाली आहे. तुम्हाला 'चुप चुप के' हा चित्रपट माहितीच असेल. यावेळी तुमच्या आमच्या सर्वांच्याच लक्षात राहिलेली भुमिका कोणाची असेल तर ती म्हणजे राजपाल यादवची. त्यांच्या भुमिकेनं आणि विनोदानं प्रेक्षकांना अक्षरक्ष: वेड लावलं होतं. परंतु तुम्हाला त्याच्या या चित्रपटातील हेअरस्टाईल आठवतेय का... या हेअरस्टाईलसाठी राजपाल यादव यांनी चक्क 26, 000 रूपये खर्च केले होते आणि चक्क चित्रपटाच्या डिरेक्टरनंच यासाठी अनेक क्लृप्त्या केल्या होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'चुप चुप के' हा चित्रपट आपल्या सर्वांनाच आठवत असेल या चित्रपटानं आपल्या पोटभरून हसवलं. परंतु या चित्रपटातील कलाकारांनी मात्र आपापल्या भुमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतली होती. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यातीलच एक पात्र होतं ते म्हणजे राजपाल यादव याचे. बांडिया नावाचे पात्र त्यांनी साकारले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत करीना कपूर, परेश रावल, शाहिद कपूर आणि ओम पूरी यांच्याही महत्त्वाच्या भुमिका होत्या त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगली. सर्वांच्या भुमिकांना प्रेक्षकांनी डोक्यावर उचलले होते. त्यामुळे त्यांची ही पात्रं आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. 


नुकत्यात ललनटॉपला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता राजपाल यादव यानं आपली एक आठवण सांगितली आहे जी ते कधीच विसरणार नाहीत. ते म्हणाले की, ''मला एक दिवस दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा फोन आला मग त्यांनी सांगितले की मला तुझी 40 दिवस तरी गरज आहे. एका फिल्मसाठी फार मोठा रोल आहे. मला विश्वासच बसत नव्हता की माझ्यासाठी एवढा मोठा रोल आहे.


हेही वाचा - लोकप्रिय गायिका ICU मध्ये... चाहत्यांना चिंता, आता कशी आहे तिची तब्येत?


मग या बातमीनं मी त्यांच्याजवळ मस्त हिरोचा लुक करून पोहचलो. तेव्हा मी चक्क तो हिरोचा लुक करण्यासाठी हेअर स्टालिस्ट अलिम हकीमकडे गेलो आणि चक्क 26 हजार रूपये मोजून आलो. मग मी जसा सेटवर पोहचलो तेव्हा मला एका माणसासोबत पाठवले आणि चक्क माझ्या डोक्यावर कटोरा ठेवला आणि माझे सगळे केस उडवून टाकले, हे त्या रोलसाठी केलं तो जो मी चुप चुप के मध्ये केला होता.''