Madonna Hospitalized: लोकप्रिय गायक आणि गायिका आपल्या समधूर आवाजानं चाहत्यांना कायमच घायाळ करताना दिसतात. सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशाच एका गायिकाची. मेन्डोना या गायिकेची सध्या सर्वत्र चर्चा आहे. 24 जूनला तिची अचानक तब्येत बिघडल्यानं तिला चक्क रूग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी तिला आयसीयूमध्ये दाखल करावे लागले त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिची काळजी वाटू लागली. समोर आलेल्या माहितीनुसार, ती बेशुद्ध पडली आणि त्यानंतर ती काहीच प्रतिसाद देत नव्हती. परंतु आता तिची तब्येत सुधारत असून तिच्यावर औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत. मेन्डोना या गायिकेच्या मेडिकल हेल्थबाबत एक मोठी अपडेट सांगणारी इन्टाग्राम पोस्ट शेअर करण्यात आली आहे ज्यात सांगण्यात आलं आहे की तिची तब्येत आता सुधारते आहे.
माहितीनुसार असे कळते आहे की, ती 12-12 तास आपल्या गाण्यांसाठी रियाज करायची त्यामुळे तिची तब्येत आणखी बिघडली आहे. समोर आलेल्या पोस्टमध्ये असं लिहिलंय की, शनिवारी 24 जूनला मेन्डोनाला गंभीर बॅक्टेरियअल इन्फेक्शन झाले होते. त्यामुळे तिला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. तिच्या तब्येतीत आता सुधारणा होते आहे. तिच्यावर अद्यापही उपचार सुरू आहेत. लवकरच ती बरी होईल. यावेळी तिच्या आजारपणामुळे तिनं सर्व कमिटमेंट्स आणि टूर त्याबरोबर गाण्यांचे रेकोर्डिंग आणि कॉन्सर्स्ट्स रद्द केल्या आहेत. लवकरच याबद्दल नवी माहिती दिली जाईल असं या पोस्टमध्ये म्हटलं असून लवकरच नव्या तारख्या समोर येतील.
@guyoseary या नावानं एका युझरनं इन्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या ही पोस्ट व्हायरल होत असून या पोस्टखाली नानातऱ्हेच्या कमेंट्स येताना दिसत आहेत. यावेळी तिच्या स्पिडी रिक्व्हरीसाठी तिचे चाहते प्रार्थना करताना दिसत आहेत. त्यामुळे तिच्या फॅन्सनी तिच्या पोस्टखाली ती लवकरच बरी व्हावी म्हणून प्रार्थना केली आणि तिच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मक कमेंट्स करताना दिसत आहेत.
हेही वाचा - धर्मेंद यांच्या भावनिक पोस्टला लेकीचं उत्तर, Esha Deol ची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट
मेन्डोना ही 64 वर्षीय अभिनेत्री आहे. ती एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिची अनेक गाणीही लोकप्रिय आहेत त्यामुळे तिची चांगलीच चर्चा होताना दिसते. तिची अनेक पॉप गाणी लोकप्रिय आहेत. तिला क्विन ऑफ पॉप म्हणूनही संबोधले जाते. तिची अनेक गाणी ही लोकप्रिय असून तिचे अनेक अल्बम गाजले आहेत. त्यामुळे तिच्या या आजारपणामुळे चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जाते आहे.