नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच माजी क्रिकेटर झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे हे दोघं लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर दोघेही आपला हनीमून मालदीव येथे एन्जॉय करत आहेत.


सोशल मीडियात अॅक्टीव्ह


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालदीव येथे हनीमूनसाठी गेलेले झहीर आणि सागरिका हे दोघेही सोशल मीडियातही अॅक्टीव्ह आहेत आणि आपले फोटोज शेअर करत आहेत.


सागरिकाने शेअर केला फोटो


सागरिका घाटगे आपल्या या खास क्षणांना कॅमेऱ्यात केद करुन ते सोशल मीडियात शेअर करत आहे. सागरिकाने एक असा फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये रुममधून बाहेरचं दृश्य स्पष्ट दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये सागरिकाने लिहिलं आहे की, सकाळचा प्रकाश घेताना...



सागरिका शेअर करत असलेल्या फोटोजवर अनेक युजर्स कमेंट्स करत झहीर आणि सागरिका यांना शुभेच्छा देत आहेत. मात्र, त्याच दरम्यान एका युजरने चुकीची कमेंट केली. त्यानंतर त्याला दुसऱ्या युजरने प्रत्युत्तर दिल्याचं पहायला मिळालं.



एका युजरने लिहिलं की, "हा सेक्स नंतरचा फोटो आहे का?" यावर दुसऱ्या युजरने प्रत्युत्तर देताना म्हटलं की, "हाच प्रश्न तु तुझ्या बहिणीला विचार".


Image Courtesy: Instagram

मात्र, यावर अद्याप सागरिकाने कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाहीये. अभिनेता शाहरूख खानच्या 'चक दे इंडिया' सिनेमातून सागरिका घाटगे प्रकाश झोतात आली. सागरिकाने मराठी सिनेमातही काम केलं आहे.


Image Courtesy: Instagram

सागरिका आणि झहीर खान यांचा विवाहसोहळा २३ नोव्हेंबरला नोंदणी पद्धतीने पार पडला. लग्नसोहळ्यानंतर मुंबईत रिसेप्शनचे आयोजन केलं होतं.