सागरिकाने हनीमूनचा फोटो केला शेअर, सानिया मिर्झाने घेतली फिरकी

टीम इंडियाचा माजी फास्ट बॉलर झहीर खान आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे नुकतेच विवाहबद्ध झाले. आता हे लव्ह बर्ड्स हनीमूनसाठी मालदीवच्या टूरवर गेले आहेत.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 8, 2017, 05:43 PM IST
सागरिकाने हनीमूनचा फोटो केला शेअर, सानिया मिर्झाने घेतली फिरकी title=
Image: Instagram

नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी फास्ट बॉलर झहीर खान आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे नुकतेच विवाहबद्ध झाले. आता हे लव्ह बर्ड्स हनीमूनसाठी मालदीवच्या टूरवर गेले आहेत.

सागरिका आणि झहीर खान यांचा विवाहसोहळा २३ नोव्हेंबरला नोंदणी पद्धतीने पार पडला. लग्नसोहळ्यानंतर मुंबईत रिसेप्शनचे आयोजन करण्यात आलं होतं.

आपल्या हनीमून टूरवरुन अभिनेत्री सागरिका घाटगेने झहीर खानचा एक फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

Zaheer Khan and Sagarika Ghatge
Image Courtesy: Instagram

सागरिकाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करताच युजर्सने लाईक्स आणि कमेंट्स करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान, टेनिसपटू सानिया मिर्झानेही एका फोटोवर कमेंट केली आहे.

Zaheer Khan and Sagarika Ghatge
Image Courtesy: Instagram

सानिया मिर्झाने कमेंट केलेल्या फोटोत झहीर खान समुद्र किनाऱ्यावर एका नेटवर झोपलेला दिसत आहे आणि त्यासोबतच समुद्र किनाऱ्यावरील नजाऱ्याचा आनंद घेत आहे.

Zaheer Khan and Sagarika Ghatge
Image Courtesy: Instagram

सानिया मिर्झाने झहीर-सागरिका यांची टेर खेचत या फोटोवर कमेंट करत म्हटलं आहे की, "असं वाटत आहे की झहीर एकटाच हनीमून सेलिब्रेट करत आहे". सानिया मिर्झाने केलेल्या या कमेंटवर युजर्सही कमेंट करत आहेत.

Zaheer Khan and Sagarika Ghatge
Image Courtesy: Instagram

सानिया मिर्झाच्या कमेंटवर युजर्स म्हणतात की, तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात. तसेच सागरिकाच्या या इंस्टाग्राम पोस्टवर युजर्सने दोघांनाही शुभेच्छाही दिल्या आहेत.

Zaheer Khan and Sagarika Ghatge
Image Courtesy: Instagram

दरम्यान, सागरिका आणि झहीर खान यांचा एक व्हिडिओही इंटरनेटवर युजर्सच्या पसंतीस पडत आहे. लग्नानंतर काही दिवसांतच दोघांनी एक फोटोशूट केलं होतं. हे फोटोशूट दोघांनी 'हार्पर्स बाजार ब्राइड इंडिया' या मॅगझिनसाठी केलं होतं.

या व्हिडिओत झहीर खान आणि त्याची पत्नी सागरिका यांनी फोटोशूट दरम्यान केलेली मस्तीही कॅमेऱ्यात केद करण्यात आली आहे.