मुंबई : लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' चित्रपट अजूनही प्रेक्षकांच्या आठवणीत असलेला आहे. चित्रपटातील प्रत्येक कलाकरानं प्रेक्षकांची मने जिंकली. चित्रपटातील आर्चीचा भाव म्हणजेच प्रिन्सची भूमिका साकारणारा सूरज पवार अलीकडेच फसवणुकीच्या आरोपामुळे चर्चेत आला होता. मंत्रालयात नोकरीचं आमिष देऊन शिर्डीतील एका व्यक्तिला फसवल्याचा आरोप सूरजवर करण्यात आला होता. याप्रकरणी राहुरी पोलिसांनी सूरजची सहा तास चौकशी केली होती. 


बातमीची लिंक : 'अक्षयपासून दूर राहा', दुप्पट वयाच्या रेखा यांच्या कृती पाहून रवीना टंडनचा संताप अनावर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूरजनं या प्रकरणात आता मौन सोडलं आहे. सूरजनं फेसबूक अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत त्यांन संपूर्ण गोष्ट सांगितली आहे. 'नमस्कार मी सूरज पवार, गेल्या दहा-पंधरा दिवसात माझी एवढी मानहानी झाली किंवा केली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सगळ्याच‌ मीडियांनी माझे एवढे धिंडवडे काढले. तरी पण मी शांत होतो. अखेर मी स्वत: राहुरी पोलीस स्टेशनला हजर झालो. पोलिसांसमोर सर्व कागदपत्रांसह माझे म्हणणे नमुद केले. त्यानंतर वेळोवेळी राहुरी पोलीस सांगतील त्या दिवशी हजर राहात होतो. पोलीस स्टेशनला पहिल्यांदा हजर राहिलो आणि बाहेर मिडीयात 'प्रिन्सला पोलीसांनी केली अटक! प्रिन्स खाणार जेलची हवा! प्रिन्स अखेर जेरबंद!' या अशा मधळ्याच्या बातम्या देऊन प्रिंट आणि डिजिटल मिडीयानं कुठलीही शहानिशा न करता माझ्या नावाने महाराष्ट्रभर रान पेटवलं,' असं सूरज या पोस्टमध्ये म्हणाला. 


आणखी वाचा : 'दृश्यम 2' प्रदर्शित होण्याआधीच अभिनेत्रीचा 'ते' बोल्ड फोटो होतोय व्हायरल



आणखी वाचा : लेकाच्या 'त्या' कृतीवर काजोल म्हणते, 'चुका होतात पण...'


पुढे सूरज म्हणाला, 'खरे पहाता राहूरी पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या फिर्यादीत आणि त्यानंतर दाखल झालेल्या असंख्य तक्रारीत तक्रारदारांनी मला फक्त चित्रपटात काम करताना पाहीलं होतं. परंतू प्रत्यक्षात ते मला कधीच भेटले नव्हते. राहूरी पोलीस‌ स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी अखेर सर्व तक्रारदारांना पोलीस स्टेशनला बोलवून त्याची खात्री करून घेतली. तर एकाही तक्रारदारची माझ्या बाबत तक्रार नव्हती. आरोपींनी बचाव हेतून ठेवून माझं नाव घेतलं होतं हे पोलीसांसमोर सिध्द झालं. पोलीस अधिकारी श्री. दराडे साो आणि श्री. सज्जनकूमार न-र्हेडा आणि पोलीस टिमनं सर्व सत्यता पडताळली आणि अखेर माझ्यावर लागलेलं "किटाळ" एकदाचं संपलं.'


आणखी वाचा : 'या' बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीनं पळून जाऊन दिग्दर्शकाशी केलं लग्न!


पुढे सूरज म्हणाले, 'पण यामध्ये झालेली मानहानी हे नुकसान कधी भरून येणारं आहे. माझ्या जवळच्या लोकांचा माझ्यावरील विश्वास या प्रकरणातून उडाला. असंख्य जवळची माणसं आणि नाती माझ्यापासून दुर गेली. पाच महिन्यापूर्वी माझे लग्न झाले अशा आलेल्या बातम्यांनंतर माझ्या पत्नी व तिच्या घरच्यांची परिस्थिती न सांगीतलेली बरी. या प्रकरणा नंतर सुखाच्या काळात माझ्या सोबत मज्जा मस्ती करणारे एकही मित्र या पडत्या काळात मदतीला धावली नाही. पण काही जवळचे चार लोकांनी मला धिर देवून या संकटात मदत केली त्यांचा शत:शहा ॠणी आहे..!'


आणखी वाचा : दोन्ही किडनी निकामी, उपचारासाठीही पैसे नाहीत; अभिनेत्रीची प्रकृती चिंताजनक


15 सप्टेंबर रोजी राहुरी याठिकाणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंत्रालयात नोकरी देण्याच्या बहाण्यानं त्याच्याकडून 5 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप सूरजवर करण्यात आला होता. या प्रकरणात तीन आरोपींना आधीच अटक झाली होती, या आरोपींनी सूरजचं नाव बचावाखातर घेतल्याचा आरोप सूरजनं केला आहे.