मुंबई : पुलवामामध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यात 40 भारतीय वीरजवानांना आपल्या प्राणाची आहूती द्यावी लागली. आतंकवादी संघटनांनी घडवलेल्या हल्ल्यामुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचे पडसाद जनसामान्यांपासून ते राजकीय, क्रि़डा, कलाविश्वात उमटताना दिसत आहेत. हल्ल्याच्या निषेधार्थ बॉलिवूड मंडळी फार टोकाचे पाउल उचलताना दिसत आहेत. कलाविश्वात पाकिस्तनी कलाकारांना बॅन करण्याच्या चर्चंना उधाण येत आहे. अनेक बॉलिवूड मंडळी त्याचप्रमाणे देशातील जनता पेटीएमच्या माध्यमातून शहीदांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी पुढे येत आहेत.


नुकताच सलमान खानने पाकिस्तानी कलाकार अतिफ असलमला 'नोटबुक' सिनेमातून  काढण्याचे आदेश आपल्या प्रोडक्शन टीमला देऊन गाण्याचं पुन्हा नव्याने रेकॉर्डिंग करण्यास सांगितलं होते.  हे गाणं पुन्हा कोण गाणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागले होते, तर हे गाणं खुद्द सलमानच्या आवाजात रेकॉर्ड होणार आहे.
 
टी-सीरिज म्युझिक कंपनीने पाकिस्तानी गायक अतिफ अस्लमच्या गाण्याला युट्यूब वरुनही काढण्यात आले आहे. आतिफ अस्लमचं 'बारिशें' हे गाणं १२ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित करण्यात आलं होतं. गाणं प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालं होतं.
 
सलमान खानच्या प्रोडक्शन अंतर्गत साकारणाऱ्या 'नोटबुक' या सिनेमाच्या टीमने पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाला 22 लाख रूपये मदत म्हणून देण्याचं घोषित केलंं त्याचप्रमाणे पाकिस्तानी गायक अतिफ अस्लमला सिनेमातून बेदखल करण्याचा महत्त्वाचा निर्णही सिनेमाच्या टीमने घेतला.  
 
'नोटबुक' सिनेमाचा काही भाग काश्मीरमध्ये चित्रीत करण्यात आला. शूटिंग फक्त जवान अणि काश्मिरी लोकांमुळे याशस्वी झाली. कठीण परिस्थितीत सुद्धा भारतीय जवानांनी आम्हाला सुरक्षित ठेवलं. देशाच्या रक्षणासाठी या जवानांनी त्यांच्या प्राणांची आहूती दिली आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना करत त्यांच्या कुटुंबीयांना या कठीण प्रसंगात खंबीरपणे उभे राहता यावं असं म्हणत त्यांच्या दु:खात सहभागी असल्याची कामना सलमान खान आणि त्याच्या प्रोडक्शन टीमने केली.