Aishwarya Rai साठी Salman Khan नं `या` अभिनेत्रीला सोडलं!
सलमान खाननं ऐश्वर्या रायसाठी या अभिनेत्रीसोबत केला होता ब्रेकअप... जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री
Salman Khan Broke up With Somy Ali For Aishwarya Rai : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सलमान खान हा त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. सलमाननं त्याच्या लव्ह लाईफमध्ये आतापर्यंत अनेक मुलींना डेट केले आहे. सलमानच्या आयुष्यात अनेक मुली आल्या, मात्र त्यानं लग्न केलं नाही. सलमानच्या आयुष्यात आलेल्या मुलींमध्ये अनेक अभिनेत्रींची नावं आहेत. सलमान सगळ्यात आधी अभिनेत्री संगीता बिजलानीसोबत (Sangeeta Bijlani) रिलेशनशिपमध्ये होता. इतकंच काय तर त्या दोघांच्या लग्नाची पत्रिका देखील छापली होती. दरम्यान, काही कारणांमुळे त्यांचे लग्न मोडले आणि त्यांचा ब्रेकअप झाला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, संगीता बिजलानीसोबत लग्न मोडल्यानंतर सलमानच्या आयुष्यात सोमी अली आली. सोमी अली (Somy Ali) तर 'मैंने प्यार किया' या चित्रपटात सलमानला पाहिल्यानंतर मियामीहून भारतात त्याला भेटण्यासाठी आली होती. सलमानला भेटण्यासाठी सोमी चित्रपटांसाठी ऑडिशन देऊ लागली. अशा प्रकारे सोमीनं चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. काही वेळानंतर ते दोघे रिलेशनशिपमध्ये आले आणि जवळपास ते चार वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. मग सलमानची भेट ऐश्वर्या रायशी (Aishwarya Rai Bachchan) झाली. 'हम दिल दे चुके सनम' च्या सेटवर त्या दोघांची भेट झाली होती. त्यानंतर सलमान सगळं विसरला असं म्हटलं जातं. ऐश्वर्यासाठी सलमाननं सोमी अलीची फसवणूक केली, असं सोमी एका मुलाखतीत म्हणाली होती.
हेही वाचा : Rakhi Sawant चं लग्न मोडणार? आपबिती सांगत म्हणाली, 'मला आई व्हाचंय पण...'
सलमाननं केलेल्या विश्वास घातानं सोमी अलीला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर अभिनय क्षेत्रातील काम सोडून सोमी अली मियामीला परतली. तर त्यानंतर सलमान ऐश्वर्यासोबत रिलेशनशिपमध्ये आला होता. पण काही कारणांमुळे त्यांचाही ब्रेकअप झाला. या कारणासाठी सोमी आजही सलमानविषयी असे बरेच खुलासे करत असते. तर बऱ्याचवेळा ती सलमानवर आरोपही करत असते. काही दिवसांपूर्वी सोमीनं सलमानवर मारहाण केल्याचा खुलासा केला होता.
सोमीनं एक पोस्ट शेअर करत एक मोठा खुलासा केला होता. सलमाननं तिच्या डोक्यावर बॉटल फोडली असती तर मी रुग्णालयात असते. त्यानं माझ्या डोक्यावर थंप्सअप असलेला ग्लास ओतला होता, ज्यात रम होती आणि ती पहिली वेळ होती जेव्हा मी मद्यपानाचे सेवन करणार होती. त्यावेळी तेथे अभिनेता मित्र देखील उपस्थित होता. त्यानं हे सर्व पाहिलं होतं. मी त्याचा आदर करते म्हणून मी त्याचं नाव घेणार नाही. पण सलमाननं डोक्यावर बॉटल फोडली असती तर मी आयसीयूमध्ये असते.