Rakhi Sawant चं लग्न मोडणार? आपबिती सांगत म्हणाली, 'मला आई व्हाचंय पण...'

राखी सावंतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राखी नाटक करते असं म्हणणाऱ्या लोकांना Rakhi Sawant नं उत्तर दिलं आहे. 

Updated: Feb 3, 2023, 01:18 PM IST
Rakhi Sawant चं लग्न मोडणार? आपबिती सांगत म्हणाली, 'मला आई व्हाचंय पण...'

Rakhi Sawant Marriage : बॉलिवूडची ड्रामा क्वीन अभिनेत्री राखी सावंतची आई (Rakhi Sawant Mother) जया सावंत (Jaya Sawant) यांचं शनिवारी 29 जानेवारी निधन झालं. राखीची आई जया यांच्यावर मुंबईमधील रुग्णालयात ब्रेन ट्युमरवरील (Brain Tumour) उपचार सुरु होते. मुंबईतील क्रीकेअर रुग्णालयामध्ये जया सावंत यांनी अखेरचा श्वास  घेतला (Jaya Sawant Passed Away). मागील काही दिवसांपासून राखी सातत्याने तिच्या आईच्या तब्बेतीसंदर्भातील अपडेट्स शेअर करत होती. राखीने रुग्णालयामधील व्हिडीओ शेअर करत आईवर उपचार सुरु असल्याचं तिच्या चाहत्यांना सांगितलं होतं. मात्र, काल राखीच्या आईचं उपचादारादरम्यान निधन झालं. दरम्यान, आता राखीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल समोर आला होता. या व्हिडीओतून तिचं लग्न धोक्यात आल्याचे राखीनं सांगितलं होत. त्यानंतर तिचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तिच्या आयुष्यात सतत काहीना काही सुरु असल्याचे म्हटले जात आहे. राखीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

या व्हायरल झालेल्या व्हिडीओत राखी बोलते की 'मी लग्न केलंय... मी काय गुन्हा केला. माझ्या आईचे निधन झाले... नुकतेच तिला पुरले आणि माझी फसवणूक होत आहे. माझे नाव फातिमा आहे... मी नुकतेच माझे नाव बदलले आहे... मला फक्त सेटल व्हायचे आहे... मला पत्नी आणि आई व्हायचे आहे. रस्त्यावर यावे लागेल. राखी नाटक करतेय असं म्हणणाऱ्या लोकांसाठी मी बोलते की हे राखी सावंतचे नाटक नाही, ही माझी व्यथा आहे. एकदा राखी सावंतचे आयुष्य जगून पहा. ज्या दिवशी मी माझ्या आईला पुरले, तेव्हा... यानंतर राखी शांत झाली आणि बोलते की इथून निघून जा...'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ती पुढे म्हणाली, 'मी जिम बदलत आहे. आदिलने मीडियासमोर यावे असे मला वाटत नाही. मला त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही..., त्याने माझा शिडीसारखा वापर केला, पण आता नाही... मला त्याची पत्नी व्हायचंय... शिडी व्हायचं नाही... कोणीतरी पुढे जाण्यासाठी माझा वापर करू शकेल असं मला नकोय. माझा वापर करून तुम्ही ऑस्कर किंवा फिल्मफेअर पुरस्कार मिळवाल? राखीचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याव्हिडीओत देखील राखी तिची आपबती सांगताना दिसत आहे. 

हेही वाचा : Aryan Khan हिंदू की मुस्लिम? Shah Rukh Khan च्या पत्नीकडून खुलासा

दरम्यान, राखीचं हे पहिलं लग्न नाही. या आधी राखीचं रितेश नावाच्या व्यक्तीशी पहिले लग्न झाले होते. रितेश विषयी राखीनं खुलासा केला होता. रितेश नावाच्या तिच्या पतीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होती. अनेकांनी तिचं हे लग्न खोटं असल्याचं म्हटलं होत. मात्र, रितेशचा चेहरा हा बिग बॉस या शोमध्ये तिनं दाखवला. शो संपल्यानंतर रितेश आणि राखीचं नातं देखील तुटलं. त्याच्या काही दिवसानंतर राखीचं नाव आदिल खानशी जोडण्यात आलं. तर काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राखीनं खुलासा केला होता की तिचं आणि आदिलचा विवाह झाला आहे. त्यांचे लग्न सात महिन्यांपूर्वी झाले आहे. दरम्यान, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आदिलनं राखीशी लग्न केल्याच्या बातमीवर नकार दिल्याचे देखील तिनं सांगितलं होतं. काही काळानंतर आदिलनं त्यांच्या विवाहाला होकार दिला होता.