करिश्मा किंवा ऐश्वर्या नाहीतर अभिषेकसाठी ही अभिनेत्री होती Jaya Bachchan यांची पहिली पसंत
तुम्हाला हे माहित आहे का की, करिश्मा कपूर आणि ऐश्वर्या राय यांच्या आधी जया बच्चन यांना एका अभिनेत्रीला आपली सून बनवण्याचा निर्णय घेतला होता.
मुंबई : अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन यांनी नेहमीच हे सत्य स्वीकारले आहे की, त्यांच्या घरात फक्त जया बच्चन यांचेच चालते आणि त्या स्वभावाने थोड्या कडक देखील आहे. याची अनेक उदाहरण आपल्या समोर आले आहेत. याच कारणामुळे जया बच्चन यांनी करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला नकार दिला होता. ज्यानंतर अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांनी लग्न केलं. या दोघांना आता एक मुलगी देखील आहे. ऐश्वर्या बच्चन कुटुंबासाठी आदर्श सून ठरली आहे. ज्यामुळे जया बच्चन ऐश्वर्याला आपली मुलगीच मानतात.
परंतु तुम्हाला हे माहित आहे का की, करिश्मा कपूर आणि ऐश्वर्या राय यांच्या आधी जया बच्चन यांना एका अभिनेत्रीला आपली सून बनवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु नंतर काही कारणामुळे त्यांनी या अभिनेत्रीसोबत अभिषेकचं लग्न करण्यासाठी नकार दिला.
आता ही अभिनेत्री कोण आणि या दोघांचं लग्न तुटण्यामागे नक्की काय कारण होतं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
अभिषेक बच्चन अभिनेत्री राणी मुखर्जीच्या प्रेमात होता. या दोघांनी लग्न करण्याचा देखील निर्णय घेतला होता.
अभिषेक आणि राणी मुखर्जी यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे, या दोघांची जोडी लोकांना खूप आवडली होती आणि यासोबतच जया बच्चन यांनाही त्यांची जोडी खूप आवडली होती. युवा चित्रपटादरम्यान अभिषेक आणि राणी मुखर्जी यांची जोडी पडद्यावरची सर्वोत्कृष्ट जोडी असल्याचे म्हटले जात होते.
त्यानंतर बंटी और बबली या चित्रपटात ही जोडी दिसली आणि हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला.
मीडिया रिपोर्टनुसार जया बच्चन यांनी सुरुवातीला राणी मुखर्जी आणि अभिषेकच्या नात्याला होकार दिला कारण, याचे सर्वात मोठे कारण म्हणजे राणी मुखर्जीचे बंगाली असणे. पण जेव्हा जया बच्चन, राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चनला लगा चुनरी में दागसाठी एकत्र कास्ट करण्यात आले तेव्हा त्यांच्यात वाद सुरू झाला. ज्याचा थेट परिणाम अभिषेक आणि राणीच्या नात्यावर झाला.
या चित्रपटाच्या शुटिंगनंतर जेव्हा एकदा राणी मुखर्जीच्या घरातील व्यक्ती लग्नाची बोलणी करण्यासाठी बच्चन कुटुंबियांच्या घरी गेले. परंतु जया बच्चन यांनी लग्नाला नकार दिला. ज्यानंतर राणी आणि अभिषेक वेगळे झाले. एवढंच काय, तर त्यांनी यानंतर कधीही एकत्र काम केलं नाही.