Shahkti Kapoor Marriage : बॉलिवूडचे क्राइम मास्टर गो गो म्हणजेत शक्ती कपूर यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. शक्ती कपूर आज त्यांच्या लग्नाचा 46 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या पत्नीचं नाव शिवांगी कोल्हापुरे आहे. शिवांगी या 80 च्या दशकात चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री पैकी एक होत्या. शक्ती आणि शिवांगी यांची लव्ह स्टोरी कोणत्याही चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नाही. कशी त्या दोघांची भेट झाली आणि कसे शक्ती कपूर शिवांगी यांना पळवून घेऊन गेले. चला जाणून घेऊया शक्ती कपूर आणि शिवांगी कोल्हापुरे यांची फिल्मी लव्ह स्टोरी. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शक्ती आणि शिवांगी यांनी 1982 मध्ये लग्न केलं. त्यावेळी शिवांगी या फक्त 18 वर्षांच्या होत्या. शिवांगी कोल्हापुरे या 80 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. शिवांगी यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात ही 'किस्मत' या चित्रपटातून केली होती. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती आणि रंजीता मुख्य भूमिकेत होत्या. शक्ती कपूर यांनी देखील या चित्रपटात काम केले होते. दोघांची पहिली भेट ही याच चित्रपटाच्या सेचवर झाली होती. शक्ती आणि शिवांगी यांना याविषयी थोडीही कल्पना नव्हती की या चित्रपटानंतर त्यांचं आयुष्य बदलेल. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


या चित्रपटाला खूप दिवस लागणार होते. त्यामुळे प्रदर्शनाला उशिर होऊ नये त्यामुळे शक्ति आणि शिवांगी यांचे शूट्स एकाच दिवशी ठेवण्यात आले. एकाच दिवशी त्यांचे शूट असल्यानं ते सतत एकमेकांना भेटू लागले. या सगळ्यात त्या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. पण जेव्हा या दोघांची भेट झाली होती, तेव्हा ते दोघं करिअरमध्ये स्ट्रगल करत होते. पण ते म्हणतात ना की वाईट काळ हा लवकरच संपतो. हेच त्या दोघांसोबत घडलं ‘किस्मत’ हा चित्रपट हिट झाला आणि ते दोघं करिअरमध्ये यशस्वी झाला. 


या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, दोघं एकमेकांवर खूप प्रेम करू लागले आणि त्यात दुसरी गोष्ट म्हणजे चित्रपट देखील हिट झाला. त्या दरम्यानच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण लग्न करणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. शिवांगी यांच्या घरचे या लग्नासाठी तयार नव्हते. खरंतर शक्ती कपूर यांनी जवळपास सगळ्याच चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली होती. अनेक चित्रपटांमध्ये तर त्यांनी रेप सीन देखील दिले. ज्यामुळे प्रेक्षकांना ते आवडत नव्हते. तर दुसरीकडे शिवांगी त्यांच्या प्रेमात होत्या. 


हेही वाचा : ना अक्षय, ना अजय, ना रणवीर... पोलीस म्हणून रोहित शेट्टीचा सर्वात आवडता 'हा' अभिनेता


दरम्यान, शक्ती आणि शिवांगी यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी शिवांगी या फक्त 18 वर्षांच्या होत्या. त्यानंतर शिवांगी यांच्या वडिलांनी त्यांच्याशी बोलणं बंद केलं होतं. तर वयाच्या 19 व्या वर्षी शिवांगी आई झाल्या. त्यांनी सिद्धांत कपूरला जन्म दिला होता. त्यानंतर श्रद्धा कपूरचा जन्म झाला. लग्नानंतर शिवांगी यांनी चित्रपटसृष्टीपासून अंतर ठेवलं. त्या त्यांच्या मुलांना सांभाळू लागल्या. त्यांची मुलगी श्रद्धा कपूर ही लोकप्रिय अभिनेत्री आहे.