ना अक्षय, ना अजय, ना रणवीर... पोलीस म्हणून रोहित शेट्टीचा सर्वात आवडता 'हा' अभिनेता

Rohit Shetty : रोहित शेट्टीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सगळ्यात हॅन्डसम पोलीस कोण आहे याचा खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jan 12, 2024, 03:28 PM IST
ना अक्षय, ना अजय, ना रणवीर... पोलीस म्हणून रोहित शेट्टीचा सर्वात आवडता 'हा' अभिनेता title=
(Photo Credit : Social Media)

Rohit Shetty : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टी हा त्याच्या कॉप युनिव्हर्ससाठी ओळखला जातो. त्याच्या या कॉप युनिव्हर्समध्ये आता अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राची एन्ट्री झाली आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला कधीच सुरुवात झाली असून आता धमाक्यासोबत त्यांनी अनाउंसमेंट केली आहे. रोहितच्या 'इंडियन पुलिस फोर्स' या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांना आनंद झाला आहे. 'इंडियन पुलिस फोर्स' चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सगळेच सिद्धार्थची स्तुती करत आहेत. पण दिग्दर्शक रोहित शेट्टी हा त्याच्या नव्या पोलिस ऑफिसरनं खूप इम्प्रेस झाला आहे. नुकत्याच एका मुलाखतीत सिद्धार्थचं कौतुक केलं आहे. इतकंच नाही तर त्यानं खुलासा केला की सिद्धार्थला ओटीटीवर डेब्यू करण्यासाठी कसं तयार केलं याविषयी देखील सांगितलं. 

रोहितनं या मुलाखतीत खुलासा केला की वेब सीरिजसाठी सगळ्यात पहिले सिद्धार्थला कास्ट करण्यावरून वक्तव्य केलं आहे. याशिवाय त्यानं सांगितलं की सिद्धार्थसाठी त्याच्या डोक्यात आणखी अनेक गोष्टी आहेत. त्यानं सांगितलं की 'सिड आणि मी एकत्र काही करण्याचा प्लॅन करत होतो आणि तेव्हा मी इंडियन पुलिस फोर्सची स्क्रिप्ट वाचून दाखवली. मी त्याला हे देखील सांगितलं की ही वेब सीरिज आहे. जर तू सोबत आलास तर आपण या वेब सीरिजची शूटिंग मोठ्या अॅक्शन फिल्मप्रमाणे करू.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : मालिकांमधून लोकप्रिय झालेल्या 'या' मराठमोळ्या अभिनेत्याला डेट करतेय अनुषा दांडेकर?

यावेळी रोहितला प्रश्न विचारण्यात आला की मोठ्या पडद्यावर 'सिंघम' अजय देवगन, 'सिम्बा' रणवीर सिंह, 'सूर्यवंशी' अक्षय कुमार असे तीन कॉपच्या भूमिका असताना सिद्धार्थ कॉप म्हणून कसा आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. तर त्यांनी लगेच उत्तर दिलं की 'माझ्या हिशोबानं तो सगळ्यात हॅन्डसम कॉप आहे.' सिद्धार्थच्या कॉप यूनिवर्समध्ये एन्ट्री करण्यावर बोलायचे झाले. काही रिपोर्ट्समध्ये असं देखील समोर आलं आहे की अजय देवगणच्या 'सिंघम 3' मध्ये रोहित शेट्टीचे सगळ्या कॉप भूमिका एकत्र दिसणार आहेत, तर त्यात सिद्धार्थ देखील असेल. दरम्यान, 'इंडियन पुलिस फोर्स' ही वेब सीरिज 19 जानेवारी रोजी अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या शोमध्ये सिद्धार्थसोबत शिल्पा शेट्टी, विवेक ओबेरॉय आणि शरद केळकर देखील आहेत.