Shaitaan Box Office Day 1 : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि आर माधवन यांचा 'शैतान' हा चित्रपट काल 8 मार्च रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत होते. अजय आणि माधवनच्या या हॉरर चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. इतकंच नाही तर चित्रपट समिक्षकांकडून त्यांना चांगला रिव्ह्यू मिळाला आहे. 'शैतान' च्या प्रदर्शनासोबतच बॉक्स ऑफिसवर अजयनं त्याची जागा मिळवली आहे. या सगळ्यात आता चित्रपटानं शुक्रवारी किती कलेक्शन केलं हे जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजय देवगण आणि आर माधवनच्या 'शैतान' या चित्रपटाला प्रेक्षकांना घाबरवण्यात नक्कीच यश मिळालं आहे. या चित्रपटात आर माधवन हा शैतानची भूमिका साकारत आहे. काही ठिकाणी चित्रपटातील काही सीन हे नक्कीच तुम्हाला घाबरवतील. तर चित्रपटाची आगऊ बूकिंग आधीच झाली होती. अशात ओपनिंग डे च्या कलेक्शनकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. Sacnilk च्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, 'शैतान' नं शुक्रवारी 14.50 कोटींची कमाई केली. अजून खरे आकडे समोर आलेले नाही. त्याची आपल्या सगळ्यांना प्रतिक्षा करावी लागणार आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


यंदाच्या वर्षी अनेक मोठे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अशात 'शैतान' चित्रपटाच्या ओपनिंग डे कलेक्शनध्ये इतर चित्रपटांना मागे टाकलं नाही. कारण हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्या 'फाइटर' नं ओपनिंग डेच्या दिवशी 24.60 कोटींची कलेक्शन केलं होतं. त्यानं सगळ्यांना आश्चर्य झालं होतं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. तर 'शैतान' नं पहिल्याच दिवशी 14.50 कोटी रुपये कमावले. तर त्याच्या मागोमा शाहिद कपूरचा 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' आणि 'आर्टिकल 370' ला मागे सोडलं आहे. 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटानं ओपनिंग डेला 6.7 कोटींची कमाई केली होती. तर दुसरीकडे 'आर्टिकल 370' नं 5.9 कोटींचं कलेक्शन केलं होतं.  


हेही वाचा : Shaitan Twitter Review: 'शैतान' जेव्हा घरात येतो! लोकांना नेमका कसा वाटला चित्रपट?


दरम्यान, शैतान विषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात अजय देवगणचं कुटुंब दाखवलं असून त्याच्या पत्नीची भूमिका ही अभिनेत्री ज्योतिकानं साकारली आहे. तर त्याच्या मुलीची भूमिका ही जानकी बोदीवालानं साकारली आहे. तर अजयच्या मुलाची भूमिका ही अंगद माहलनं साकारली आहे.