शक्तिमान फेम मुकेश खन्नांवर संतापली सोनाक्षी; इशारा देत म्हणाली, प्रभू रामाने शिकवलेल्या...
Mukesh Khanna Comments On Sonakshi Sinha: मुकेश खन्ना यांनी सोनाक्षीवर केलेल्या एका वक्तव्यानंतर तिने एका त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
Mukesh Khanna Comments On Sonakshi Sinha: शक्तिमान फेम मुकेश खन्ना नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळं चर्चेत राहतात. बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर त्यांनी अनेकदा निशाणा साधला होता. मात्र, यावेळी त्यांनी सोनाक्षीवर केलेल्या टीकेचा तिने चांगलाच समाचार घेतला आहे. सोनाक्षी सिन्हाने मुकेश खन्ना यांच्यावर इन्स्टाग्राम पोस्टमधून तोफ डागली आहे. काय घडलं नेमकं जाणून घ्या.
सोनाक्षी सिन्हाने 2019 मध्ये कौन बनेगा करोडपती 11 मध्ये भाग घेतला होता. तेव्हा तिथे एक प्रश्न विचारण्यात आला होती की, रामायणात हनुमान कोणासाठी संजीवनी बुटी घेऊन आले होते. मात्र सोनाक्षीला त्याचे उत्तर देता आले नव्हते. अलीकडेच मुकेश खन्नाने मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हाला सोनाक्षीला रामायण न शिकवण्यासाठी दोषी ठरवलं आहे. त्यावर आता सोनाक्षीने मुकेश खन्ना यांच्यावर टीका करत इशारा दिला आहे.
अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटलं आहे की, 'मला आणि माझ्या कुटुंबाच्या आधारे लाइमलाइटमध्ये येण्यासाठी वारंवार एकाच घटनेवर बोलणं बंद करा. तिने पुढं लिहलं आहे की, प्रिय महोद्य, मुकेश खन्ना जी, मी अलीकडेच तुमचं एक वक्तव्य वाचलं होतं त्यात तुम्ही म्हटलं अनेक वर्षांपूर्वी आलेल्या एका कार्यक्रमात रामायणाबाबतच्या प्रश्नावर मी चुकीचं उत्तर दिलं होतं याबाबत तुम्ही माझ्या वडिलांना दोषी ठरवलं होतं. सगळ्यात पहिले मी तुम्हाला आठवण करुन देऊ इच्छिते की त्या दिवशी हॉट सीटवर दोन अन्य महिलांदेखील होत्या. त्यांनीदेखील या प्रश्नाचे उत्तर दिले नव्हते. मात्र तुम्ही माझंच नाव सतत घेत राहिलात.'
तिने पुढं म्हटलं आहे की, 'संजीवनी बुटी कोणासाठी आणण्यात आली होती मी त्यादिवशी विसरली असेल, असंदेखील होऊ शकतं. ही एक मानवी वर्तवणूक आहे. मात्र तुम्ही सरळ सरळ भगवान राम यांनी शिकवलेल्या क्षमा करणे हा पाठ विसरला आहात. जर भगवान राम मंथराला व कैकयीला माफ करु शकतात, महान युद्धानंतरही ते रावणाला माफ करु शकतात, तर निश्चितच तुम्ही छोटीशी गोष्टदेखील विसरू शकतात. माझी तुम्ही माफी मागावी, अशी माझी इच्छा नाहीये. पण एकाच घटनेवर सतत चर्चा करणे बंद करा जेणेकरुन मी आणि माझे कुटुंब चर्चेत येणार नाही.'
तसंच, सोनाक्षीने मुकेश खन्ना यांना थेट इशारादेखील दिला आहे. 'माझ्या वडिलांनी दिलेल्या संस्कारांवर बोलणे थांबवा. यापुढे तुम्ही माझ्या आई-वडिलांनी दिलेल्या संस्कारांवर बोललात तर लक्षात ठेवा की मी जे काही बोलले ते खूप सन्मानपूर्वक आहे. जेव्हा तुम्ही माझ्या पालन-पोषणाबाबत काही अप्रिय वक्तव्य करण्याचा निर्णय घेतला. मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि धन्यवाददेखील, सोनाक्षी सिन्हा.'