उपमुख्यमंत्री शिंदेंना निकटवर्तीय मोठा धक्का देण्याच्या तयारीत? प्रोफाइलवरुन 'धनुष्यबाण' हटवून...

Maharashtra Cabinet Expansion Eknath Shinde Close Aide Removed Party Symbol From Social Media: मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्यामधील नाराजींची खदखद पक्षांना महागात पडणार असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात असतानाच ही बातमी समोर आली आहे.

| Dec 17, 2024, 08:01 AM IST
1/12

tanajisawant

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निकटवर्तीयच त्यांना मोठा धक्का देणार? सोशल मीडियावरुन नेमकं त्याने काय संकेत दिलेत पाहूयात...

2/12

tanajisawant

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार रविवारी पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.  

3/12

tanajisawant

फडणवीसांच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये जुन्या आणि नव्या सदस्यांचा मेळ साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एकूण मंत्र्यांपैकी 55 टक्के जुन्याच सदस्यांना संधी देण्यात आली असून पहिल्यांदाच मंत्री झालेल्या आमदारांची संख्या 45 टक्के इतकी आहे.

4/12

tanajisawant

मात्र या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक प्रस्थापितांना जोरदार धक्का देण्यात आला आहे. यामध्ये भाजपाचे सुधीर मुनगंटीवार, शिवसेनेचे दिपक केसरकर, तानाजी सावंतांबरोबरच अजित पवारांच्या पक्षातील छगन भुजबळांचाही समावेश आहे. 

5/12

tanajisawant

नाराज आमदारांची समजूत काढण्याचा पक्ष स्तरावर प्रयत्न सुरु असतानाच मंत्रिमंडळातून डच्चू मिळाल्याने माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे मात्र कमालीचे नाराज आहेत.   

6/12

tanajisawant

तानाजी सावंत यांनी फेसबुक तसेच आपल्या इतर समाजमाध्यमांवरुन धनुष्यबाण हे पक्ष चिन्हं हटवलं आहे. इतक्यावरच न थांबता सावंतांनी सूचक पद्धतीने बंडाचा इशारा दिला आहे.  

7/12

tanajisawant

पूर्वी तानाजी सावंत यांच्या फेसबुक प्रोफाइलवर धनुष्यबाण चिन्हासहीत स्वत:ची ओळख, 'मंत्री, सर्वाजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य. पालकमंत्री धाराशिव जिल्हा' अशी ठेवण्यात आली होती.

8/12

tanajisawant

मात्र मंत्रिमंडळातून डच्चू मिळाल्यानंतर तानाजी सावंतांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरील स्वत:च्या फोटोसहीत इंट्रोही बदलला आहे.  

9/12

tanajisawant

तानाजी सावंतांनी स्वत:च्या फोटोऐवजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा फोटो प्रोफाइल इमेज म्हणून लावला असून कव्हर फोटोवर बाळासाहेबांच्या फोटोसहीत, 'शिवसैनिक' असं लिहिलेला फोटो ठेवला आहे.

10/12

tanajisawant

तानाजी सावंत हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मर्जीतले नेते मानले जातात. तानाजी सावंतांना मंत्रिपद मिळेल असा शब्द शिंदेंनी दिली होती अशी आता चर्चा आहे.  

11/12

tanajisawant

शिंदे सरकारच्या कार्यकाळातील सुमार कामगिरीमुळे तानाजी सावंतांना भाजपाच्या दबावामुळे यंदा मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आता सावंत काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.

12/12

tanajisawant

दरम्यान, दिपक केसरकर यांनी नाराज आमदारांबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. "भुजबळ नाराज म्हणजे ही एक तात्पुरता फेज असते. महायुतीच्या नेत्यांनी योग्य निर्णय घेतला आहे. त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे. मी ही स्वीकारले आहे. भुजबळ मोठे नेते आहेत त्यांच्याबद्दल काही तरी विचार पक्षाने केला असेल. मुनगंटीवार ही अभ्यासू नेते आहेत त्यांच्याबद्दलही पक्षाने विचार केला असावा," असं केसरकर म्हणाले आहेत.