हिवाळ्यात कोणत्याही गोष्टीला स्पर्श करताच लागतो करंट? कारण काय?
हिवाळ्याच्या हंगामात, धातू, दरवाजाचे हँडल किंवा कापड यांसारख्या वस्तूला किंवा एखाद्या व्यक्तीला स्पर्श करताच अनेकदा विजेचा सौम्य झटका जाणवतो. यामागचं नेमकं कारण काय?
How to reduce static electricity at home: अनेकदा ऑफिस किंवा घरांमध्ये असा अनुभव येतो. आपण अचानक कोणत्या व्यक्तीला किंवा वस्तूला स्पर्श केला तर अचानक करंट लागतो. हा करंट सौम्य असला तरीही अनेकदा हिवाळ्यात हा प्रकार सर्वाधिक घडतो. यामागचे खरे कारण म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक डिस्चार्ज (ESD) आहे. ESD म्हणजे काय? आणि यामागचं शास्त्रीक कारण काय? समजून घेऊया.