भाजपा खासदार सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव अचानक रद्द, `हे असं कसं?` काँग्रेस संतप्त
Sunny Deol Villa Auction Stops : 24 तासात असं काय झालं? सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव थांबताच कॉंगेस संतप्त... जाणून घ्या संपूर्ण प्रकरण काय झालं असं.
Sunny Deol Villa Auction Stops : बॉलिवूड अभिनेता सनी देओल एकीकडे त्याच्या 'गदर 2' मुळे एकीकडे चर्चेत आहे. चित्रपटाला मिळालेलं यश हे सगळ्यांना माहित आहे. सगळीकडे त्याचीच चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे सनी देओल चर्चेत येण्याचं कारण हे त्याच्या मुंबईतील जुहू परिसरात असलेल्या बंगल्याचा लिलाव आहे. सनी व्हिलाचा लिलाव होणार होता. पण 24 तासात असं काही झालं की लिलाव थांबवण्यात आला आहे.
खरंतर काल 20 ऑगस्ट रोजी सगळ्यांना माहिती मिळाली होती ती बॅंक ऑफ बडोदानं सनी देओलला नोटिस पाठवत त्याचा सनी व्हिला या बंगल्याचा लिलाव करणार असल्याचे सांगितले होते. सनी देओलवर 56 कोटींचं कर्ज होतं आणि त्या कर्जाची परतफेड सनी देओल करू शकला नाही. त्यामुळे त्याचा बंगला हा लिलावासाठी काढण्यात आला. त्याच्या या बंगल्याच्या लिलावाची तारिख देखील जाहीर करण्यात आली होती. ती म्हणजे 25 सप्टेंबर होती. मात्र, आज म्हणजेच 21 ऑगस्ट रोजी सकाळी बातमी आली की बँक ऑफ बरोदानं हा लिलाव थांबवला आहे. त्यावर आता कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
जयराम रमेश यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये जयराम म्हणाले की 'काल दुपारी संपूर्ण देशाला ही गोष्ट कळली की बॅंक ऑफ बडोदा भाजपाचे खासदार सनी देओलचा जुहूमध्ये स्थित असलेला बंगल्याचा ई-लिलाव करणार आहे. त्यानं बँकेला 56 कोटींची परत फेड केली नाही. आज सकाळी 24 तासा पेक्षा कमी काळात ही बातमी समोर आली की बॅंकनं तांत्रिक कारणांमुळे या लिलावाला थांबवलं आहे. आश्चर्य होतंय की तांत्रिक कारणं कोणी समोर आणली?'
काय म्हटलं होतं जाहिरातीत?
बॅंकेनं जाहिरातीत म्हटलं आहे की 25 सप्टेंबर रोजी सनी व्हिलाचा लिलाव होणार आहे. या लिलावासाठी प्रॉपर्टीची किंमत ही 51.43 कोटी ठेवण्यात आली आहे. त्यानंतर या किंमतीवरून पुढे हा लिलाव होणार आहे.
हेही वाचा : Gadar 2 नं 300 कोटी कमावूनही सनी देओलला कर्ज फेडता येईना! मुंबईतील घरावर आली जप्तीची वेळ
दरम्यान, सनी देओलच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्याचा 'गदर 2' बॉक्स ऑफिसवर गदर करत आहे असं म्हणायला हरकत नाही. सनी देओलची तारा सिंग ही भूमिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. या चित्रपटानं 10 दिवसात बॉक्स ऑफिसवर जवळपास 377 कोटींची कमाई केली होती. आता फक्त या चित्रपटानं 23 कोटींची कमाई केली तर हा चित्रपट 400 कोटींचा आकडा लवकरच पार करणार आहे.