`मध्यरात्री शाहरुख खान मला...`; छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीनं केला खुलासा, म्हणाली `अपघातानंतर तो...`
Tv Actress Talked About Shah Rukh Khan : छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Tv Actress Talked About Shah Rukh Khan : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री निक्की अनेजानं तिच्या वाईट काळाविषयी खुलासा केला आहे. निक्की अनेजानं तिच्या गंभीर अपघाताविषयी सांगत सांगितलं होतं की शाहरुखनं त्यावेळी तिची कशी मदत केली होती. निक्की जवळपास दीड महिने रुग्णालयात होती आणि त्यावेळी शाहरुखनं तिच्यासाठी जे केलं त्याला ती आजपर्यंत विसरू शकलेली नाही. निक्की अनेजाचा जेव्हा अपघात झाला होता तेव्हा ती एका शोचं शूटिंग करत होती. या शूटिंगच्या वेळी गाडी तिच्यावरून गेली होती.
निक्की अनेजानं 'सिद्धार्थ कनन'शी बोलताना सांगितलं की 'शाहरुख मध्यरात्री तिला भेटायला आला होता. त्यानंच ज्या गाडीनं अपघात केला त्या गाडीचा ड्रायव्हर कोण होता याची ओळख पोलिसांना करुन दिली होती. निक्की अनेजानं सांगितलं की मी दीड महिन्यापर्यंत रुग्णालयात होते. माझ्यावर उपचार सुरु होते आणि मी बेशुद्ध झाली होते. एकदिवस रात्री मी अचानक उठले आणि पाहिलं तर शाहरुख खान माझ्या रुग्णालयातील बेडच्या शेजारी बसला होता. मला वाटलं की मी खूप जास्त औषध घेतली आहेत आणि शाहरुख तिथे असल्याचे भास मला होतायत.'
निक्कीनं पुढे सांगितलं की 'शाहरुखनं माझा हात पकडला आणि म्हणाला, निक्की मी शाह आहे. मला माफ कर, रात्रीचे 12 वाजलेत पण बाहेर पापाराझी असल्यानं मी त्यांच्या जाण्याची प्रतीक्षा करतोय. मी फक्त रात्रीच येऊ शकतो. त्यानंतर त्यानं माझ्या डोक्यावरून हात फिरवत मला कुरवाळायला सुरुवात केली. त्यानंतर त्यानं मला विचारलं की मी कशी आहे? मला काही हवं आहे का?'
निक्की पुढे याविषयी सांगत म्हणाली, 'मी त्याला विचारलं की तू इथे काय करतोयस? त्यानं सांगितलं की एका प्रश्नाचं उत्तर दे. तुला लाल रंगाच्या मारुति व्हॅनन धडक दिली होती? मी हो म्हणाले आणि विचारलं की पण तू असं का विचारतोयस? तेव्हा शाहरुखनं सांगितलं की त्यानं त्याच लाल रंगाच्या गाडीला त्याच दिवशी फिल्म सिटीमध्ये पाहिलं होतं आणि निक्कीच्याच टीव्ही शोचा क्रू मेंबर ड्रायव्हिंग शिकत होता. शाहरुख म्हणाला की णी देवदासच्या शूटिंगसाठी जात होतो आणि त्या लाल मारुतिमधून कोणाला ड्रायव्हिंग शिकवण्यात येत होते. शाहरुखनं सांगितलं की मी तिथे 10 मिनिटं प्रतीक्षा केली कारण ती व्यक्ती गाडी चालवायची कशी हे शिकत होती आणि तिथून पुढे जाण्यासाठी जागा देखील नव्हती. तर शाहरुखनं मला सांगितलं की ज्या व्यक्तीनं धडक दिली, खरंतर त्याला ड्राइव्ह करता येत नव्हतं.'
हेही वाचा : अनन्या पांडेला दूध पाजताना आजी पित होती बियर; फोटो पाहून नेटकऱ्यांना आली दिलजीत दोसांझची आठवण
निक्कीनं पुढे सांगितलं की 'एक हजार रुपये वाचवण्यासाठी प्रोडक्शन क्रूनं एका अशा व्यक्तीला कामावर ठेवलं ज्याला गाडी चालवता येत नव्हती. त्यामुळे तिचं करिअर खराब झालं. शाहरुख ज्या प्रकारे सगळं काम सोडून मला सांगायला आला, त्यानंतर माझ्या मनात त्याच्यासाठी असलेला आदर आणखी वाढला. शाहरुखनं मला सांगितलं की प्रोडक्शन हाउसविरोधात तक्रार दाखल कर.'