Twinkle Khanna : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना ही चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी देखील चर्चेत असते. ट्विंकल खन्ना ही तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे अनेकदा चर्चेत राहते. ट्विंकल खन्ना एक लोकप्रिय लेखिका देखील आहे. तिची पुस्तक आणि तिच्या मुलाखती या नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.  ट्विंकलनं अनेक मॅग्झिनसाठी कॉलम्स लिहिले आहेत. त्यापैकी एका कॉलममध्ये ट्विंकलनं तिची आई डिंपल कपाडिया यांच्याविषयी असं काही लिहिलं की सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. चक्क तिनं म्हटलं होतं की तिला आई डिंपलचा गळा दाबण्याची इच्छा झाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विंकलनं या कॉलममध्ये तिच्या खासगी आयुष्याविषयी लिहितं सगळ्यांचे लक्ष वेधले होते. ट्विंकलनं खुलासा केला होता की वडील राजेश खन्ना यांच्या निधनानंतर ती आई डिंपल यांच्या खूप जवळ आली होती. पण असं काही झालं की ट्विंकलला आईचा इतका राग आला की ती स्वत: ला थांबवू शकत नव्हती. एका कॉलममध्ये या गोष्टीचा खुलासा करत ट्विंकलनं सांगितलं की एकदा डिंपल यांनी असं काही केलं की तिला खूप राग आला होता. त्यावेळी तिनं स्वत: ला कसं तरी थांबवल किंवा शांत केलं होतं. 



हेही वाचा : 'कोणीतरी माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला अन्...', हेमा मालिनी यांना मुंबईतील घरात आला होता भयानक अनुभव


ट्विंकलनं सांगितलं की एकदा डिंपल यांनी तिच्या केसांच्या हायलाईटवरून कमेंट केली होती. त्या म्हणाल्या होत्या की केस पाहून असं वाटतंय की कोणी पान खाऊन थुंकलं आहे. हे ऐकल्यानंतर ट्विंकलला खूप राग आला आणि तिनं स्वत: ला कसं तरी आवरलं कारण ती जाऊन आईचा गळा दाबेल. पुढे ट्विंकलनं हे देखील म्हटलं की आईनं हे मस्करीत म्हटलं होतं. पण मला खूप राग आला होता. 


हेही वाचा : करीनाला डेटवर नेणं कमी खर्चाचं; तिचा आवडता मराठी पदार्थ पाहून म्हणाल अरे ही तर आपल्यातलीच...


ट्विंकल विषयी बोलायचे झाले तर ती तिच्या स्पष्ट मतांसाठी ओळखली जाते. तिला जे वाटेल ते ती कोणत्याही गोष्टीची चिंता न करता बोलून जाते. याविषयी स्वत: तिचा पती म्हणजे अक्षय कुमारनं खुलासा केला होता. त्याला देखील ट्विंकल कधी काय पोस्ट करेल याची भीती वाटते. ट्विंकलचा एक शो असून त्याचं नाव ट्विक इंडिया असे आहे.