करीनाला डेटवर नेणं कमी खर्चाचं; तिचा आवडता मराठी पदार्थ पाहून म्हणाल अरे ही तर आपल्यातलीच...

Kareena Kapoor Khan :  करीना कपूर खान ही नेहमीच तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते. आता करीना एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे आणि त्याचं आहे तिला आवडणारा मराठमोळा पदार्थ...

दिक्षा पाटील | Updated: Aug 29, 2023, 06:13 PM IST
करीनाला डेटवर नेणं कमी खर्चाचं; तिचा आवडता मराठी पदार्थ पाहून म्हणाल अरे ही तर आपल्यातलीच... title=
(Photo Credit : Social Media)

Kareena Kapoor Khan : बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर खान ही लोकप्रिय आणि चर्चेत असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. करीना कपूर ही सध्या तिच्या जाने जा या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात करीना एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. करीना कपूर ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांशी संपर्कात राहते. करीना कपूरनं नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिचा आवडता पदार्थ कोणता याविषयी खुलासा केला आहे. 

करीनानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये करीनानं तिचे दोनं पांढरा टॉप परिधान केलेले फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत करीनानं असं कॅप्शन दिलं आहे ज्यातून तिला कोणता पदार्थ सगळ्यात जास्त आवडतो त्याचा खुलासा झाला आहे. करीनाला पिझ्झा, पास्ता, बिर्यानी, इटॅलियन, चायनीझ किंवा कॉन्टिनेंटल डिश नाही तर तिला एक मराठमोळा पदार्थ आवडतो. करीनाला वरण-भात आवडत असल्याचं तिनं म्हटलं आहे. करीनानं हे फोटो शेअर करत कॅप्शन दिलं आहे की 'If post वरण भात look was a thing… this would be it.' त्यासोबत करीनानं जेवण फस्त केल्याचं इमोजी देखील वापरलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

करीनाची ही पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी करीनाचं महाराष्ट्राच्या पदार्थांवर असलेलं प्रेम कळलं आहे. तर अनेकांनी त्यांचही हेच प्रेम असल्याचं म्हटलं आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट करत म्हटलं की वरण भात प्रेमी इथे आहेत. दुसरा नेटकरी म्हणाला, बेबो तुला वरण-भात शोभतो. तर अभिनेत्री सई रानडेनं देखील करीनाच्या पोस्टवर कमेंट केली आहे. सई रानडे म्हणाली की वरण-भात, तूप, मीठ आणि लिंबाचं लोणचं. आणखी एका नेटकऱ्यानं कमेंट करत करीनाच्या सुंदरतेची स्तुती केली आहे. किती सुंदर दिसतेस बेबो. 

हेही वाचा : 'प्रेमात पडले आणि कळलंच नाही...' प्राजक्ता माळीचा जाहीर खुलासा

करीनाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती 'जाने जा' या चित्रपटातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे. तिचा हा चित्रपट 21 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, असे म्हटले जाते की शाहरुख खानचा जवान प्रदर्शित होईल तेव्हा त्याच्या इन्टर्व्हलमध्ये करीनाच्या 'जाने जा' या चित्रपटाचा ट्रेलर पाहायाला मिळेल. या ट्रेलरला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.