`घराचा कॅफे केलाय बाईने...`, मराठमोळ्या अभिनेत्रीच्या त्रस्त नवऱ्याची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल
Umesh Kamat Viral Video : उमेश कामत हा सोशल मीडियावर सक्रिय असून त्यानं नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओत त्यानं त्याच्या पत्नीला असलेल्या कॉफीच्या व्यसनाविषयी सांगितलं आहे. इतकंच काय तर त्यासोबतच त्यानं एका लग्न झालेल्या पतीची कथा देखील सांगितली आहे.
Umesh Kamat Viral Video : मराठी सेलिब्रिटी कपल उमेश कामत (umesh kamat) आणि प्रिया बापट (priya bapat) हे चांगलेत लोकप्रिय आहेत. त्या दोघांना एकत्र पाहताच अनेकांना असं वाटतं की आपल्या आयुष्यातही अशीच व्यक्ती आली पाहिजे किंवा मग आपली जोडी अशीच दिसली पाहिजे असं देखील बोलतात. तर उमेश किंवा प्रियानं एकत्र फोटो शेअर केल्यानंतर त्यावर मेड फॉर इच अदर किंवा मग कपल गोल्स अशा कमेंट करतात. त्या दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. दरम्यान, नुकताच उमेशनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात त्यानं एका नवऱ्याची कथा सांगितली आहे. त्याला कोणत्या गोष्टी कराव्या लागतात आणि लग्नानंतर त्याला कोण-कोणत्या गोष्टी कराव्या लागतात हे सांगितलं आहे.
उमेशनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत उमेश सगळ्यात आधी किचनमध्ये आनंदानं कॉफी बनवताना दिसला. आता ही कॉफी उमेश स्वत: साठी नाही तर त्याची लाडकी बायको प्रियासाठी आहे. त्यानंतर उमेश प्रियाला आवज देतो की कॉफी तयार आहे. पण प्रिया त्यावर उत्तर देत नाही. उमेश एकदा नाही तर दोन-तीनवेळा आवाज देतो पण त्यावर प्रिया उत्तर देत नाही. अखेर उमेश परत हाक मारतो की प्रिया कॅपेचिनो रेडी आहे. यावेळी उमेश प्रियाला जसं कॅफेमध्ये कस्टमरला आवाज देतात तसा आवाज देतो. त्यावर प्रिया लगेच उत्तर देत आले. या व्हिडीओत उमेशनं कॅप्शन दिलं आहे की सारखं कॅफेमध्ये जाण्याची सवय असलेल्या बायकोला घरी कॉफी देणाऱ्या नवऱ्याची कथा. त्यानंतर पुढे उमेश म्हणाला, घराचा कॅफे केलाय बाईंनी. माझ्या बायकोला आवडते माझ्या हातची कॉफी हीच मला मिळालेली खरी ट्रोफी, असं म्हटं आहे.
हेही वाचा : लेकीच्या जन्मानंतर आलियाचं वजन Unnaturally कमी? अभिनेत्रीनं सांगितलं सत्य
उमेश आणि प्रियाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी म्हणाला, प्रिया मॅम दिसली असती तर मज्जा आली असती. दुसरा नेटकरी म्हणाला, हे खूप चांगल आहे. तिसऱ्या नेटकरी म्हणाला, आवडलय. आणखी एक नेटकरी म्हणाला, कपवर नाव लिहायचं राहिलं. दुसरी नेटकरी म्हणाली, माझा नवरा देखील रोज माझ्यासाठी कॉफी बनवतो. कधी आयरिश कधी कोलंबियन तर कधी कोणती.