Alia Bhatt on Weight Loss Journey : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (alia Bhatt) ही सतत चर्चेत असते. कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी तिच्या फिटनेसमुळे. आलियानं लेक राहाला सी सेक्शनच्या मदतीनं जन्म दिला. त्यानंतर आलियाचं खूप वजन वाढलं होतं. आता अचानक आलियाला पुन्हा एकदा फिट पाहून अनेकांना आश्चर्य झालं आहे. अनेकांनी असं म्हटलं की आलियानं सर्जरी करत वजन कमी केलं आहे. अशा सगळ्या कारणांमुळे आलिया पुन्हा एकदा ट्रोलिंगचा शिकार झाली होती. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आलियानं या सगळ्यावर सत्य सांगितलं आहे.
आलियानं नुकतीच व्हॉग इंडियाला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिनं कशा प्रकारे वजन कमी केलं. इतकंच काय तर तिनं कोणत्याही सर्जरीच्या मदतीनं हे केलं नाही असं सांगितलं. यासोबतच आलिया सध्या राहाला ब्रेस्टफिडींग करत असल्यानं तिची अक्कल दाढ काढू शकत नाही. त्यासोबतच ती अॅनेस्थेशिया घेऊ शकत नाही असं म्हटलं. तर अनेकांना वाटतं की मी माझं वजन कोणत्या अननॅच्यूरल पद्धतीनं कमी केलं आहे पण सत्य हे आहे की मी माझी अक्कल दाढ सध्या काढू देखील शकत नाही. कारण मी राहाला ब्रेस्टफिडींग करते आणि मी अॅनेस्थिशिया घेऊ शकत नाही. तर वजन कमी करण्यासाठी ती आठवड्यातील 6 दिवस वर्कआऊट आणि डायटचं पालन करते.
हेही वाचा : समांथाचं ग्लॅमर संपलं, तिनं आता...', अभिनेत्रीच्या करिअरवर निर्मात्याचं मोठं वक्तव्य, तो आहे तरी कोण?
आलियानं खुलासा केला की तिची सासू म्हणूजेच नीतू कपूर यांनी तिच्यासाठी डिंकाचे लाडू बनवले होते. जे तिनं सहा आठवडे खाल्ले. लोकांना कळायला हवं की प्रेग्नेंसीमध्ये वजन वाढणं याचा अर्थ तुम्ही खूप खाता असं नाही. त्याचं कारण म्हणजे तुमच्यासोबत जी व्यक्ती मोठी होत आहे त्याच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. पण तुमचं जे वजन आहे ते आपल्या बिएमआय प्रमाणे योग्य असायला हवं. तुम्ही एखाद्या प्रोफेश्नल व्यक्तीशी यावर चर्चा करायला हवी, पण तुम्ही काही प्रमाणात वजन घेत वर्कआऊट करण योग्य आहे.
प्रेग्नेंसीच्या 12 आठवड्यानंतर हेवी वर्कआऊट करण्यास सुरुवात करावी असा सल्ला तिच्या डॉक्टरांनी दिल्याचे आलियानं पुढे सांगितलं. प्रेग्नंसीआधी जितकं वर्क-आऊट किंवा मग जितकं वेट ती घ्यायची तिथवर पोहोचायला तिला अजून वेळ आहे. आलिया ही साधारण रुटिन फॉलो करते रोज 15 मिनिटे वॉक आणि ब्रिदिंग एक्सर्साईज करते.