मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सारा अली खान (Sara Ali Khan) ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिनं शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच साराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सारा कॅमेऱ्यासमोर तोंड लपवताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट टीमचा क्रिकेटर शुभमन गीलसोबत (Shubman Gill) स्पॉट केल्यानंतर ते दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्यानंतर तिचा हा व्हिडीओ आता समोर आला आहे. (Sara Ali Khan Viral Video) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेही वाचा : काय आहे डिस्को किंग Bappi Lahiri यांचं खरं नाव?... म्हणून घालायचं इतकं सोनं


साराचा हा व्हिडीओ विरल भयानी या सेलिब्रिटी फोटोग्राफरनं शेअर केला आहे. या व्हिडीओत सारा जीममधून बाहेर येत असल्याचे दिसत आहे. त्यावेळी पापाराझींना पाहताच सारा तिचा चेहरा लपवते. सारा गाडीत बसते आणि चेहरा लपवण्यासाठी सीटवर बसून पुढच्या बाजुनं झुकते. 


पाहा व्हिडीओ : 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सारा नेहमीच कॅमेऱ्यासमोर हसताना आणि हात जोडून लोकांना अभिवादन करताना दिसली. हे पहिल्यांदा घडलं जेव्हा सारानं पापाराझींना पाहताच तोंड लपवलं आहे. व्हिडीओमध्ये सारा तिच्या ऍथलेटिक लूकमध्ये दिसली. व्हिडीओ पाहिल्यानंतर साराच्या चाहत्यांना तिची काळजी वाटू लागली आहे. सारा ठीक आहे का? असा प्रश्न अनेकांनी केला आहे. 


दरम्यान, सारा नुकतीच गोव्यातील 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समांरभात दिसली होती. सारानं मधुबाला यांच्या मुघल-ए-आझम या चित्रपटातील प्यार किया तो डरना क्या गाण्यावर डान्स केला. सारा अली खान ही बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अभिनेत्री अमृता सिंह (Amruta Singh) यांची मोठी मुलगी आहे.