काय आहे डिस्को किंग Bappi Lahiri यांचं खरं नाव?... म्हणून घालायचं इतकं सोनं

'याद आ रहा हैं...' म्हणत सर्वाच्या मनात घर केलेल्या Bappi Lahiri यांचा वाढदिवस... इतकं सोन का घालायचे बप्पी दा?  

Updated: Nov 27, 2022, 11:16 AM IST
काय आहे डिस्को किंग Bappi Lahiri यांचं खरं नाव?... म्हणून घालायचं इतकं सोनं  title=

Happy Birthday Bappi Lahiri : कलाकाराचा शेवट कधीच होत नाही, कारण प्रत्येक कलाकार कायम त्यांच्या कलेमुळे आणि कलेवर असलेल्या प्रेमामुळे जिवंत असतो. ज्येष्ठ गायक आणि संगीतकार बप्पी लहिरी (Bappi Lahiri) आज आपल्यात नसले तरी त्यांचे असंख्य गाणी आणि आठवणी आजही चाहत्यांमध्ये जिवंत आहेत. आज बप्पी दांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेवू त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी. खरंतर आपण प्रत्येक जण त्यांना बप्पी लहरी (Happy Birthday Bappi Lahiri) या नावाने ओळखतो पण त्यांचं खरं नाव नाही आणि ते इतकं सोनं का घालायचे याबद्दल जाणून घेवू. 

बप्पी लहरी यांचं खरं नाव
ज्यांना आपण बप्पी दा म्हणून ओळाखयतो त्याचं खरं नाव बप्पी लहिरी नसून अलोकेश लहरी होतं. त्यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 रोजी पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी याठिकाणी झाला. बप्पी दा यांच्या आईचं नाव बन्‍सारी लहिरी आणि वडिलांचं नाव अपरेश लहरी होतं. (real name of Bappi Lahiri) 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बप्पी लहिरी यांनी वयाच्या 69 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील क्रिटी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच त्यांनी कलाकारा जगाचा निरोप घेतला. बप्पी लहिरी हे त्यांच्या मनमिळाऊ आणि तितक्याच प्रेमळ स्वभावासाठी ओळखले जात होते. ( bappi lahiri hits)

बप्पी लहरी का घालायचे इतकं सोनं 

बप्पी लहिरी गोल्डसाठी अतिशय प्रसिद्ध आहेत. एका मुलाखतीत त्यांना इतकं सोनं का घालतात? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना बप्पी लहरी यांनी सांगितलं की, 'हॉलिवूडमध्ये एलविस प्रेस्ली सोन्याची चैन घालत असत. एलविस माझे अतिशय आवडते होते. मी नेहमी विचार करत होतो, जर मी जीवनात मोठं यश संपादन केलं, तर मी माझी एक वेगळी ओळख स्थापित करेन. देवाची कृपा आहे की मी इतकं सोनं घालू शकलो. सोनं माझ्यासाठी लकी असल्याचं' बप्पी दांनी सांगितलं होतं. (Bappi Lahiri gold)

एफिडेविटनुसार, बप्पी लहिरी (best of bappi lahiri) यांच्याकडे जवळपास 754 ग्रॅम सोनं आहे. तर त्यांच्या पत्नीकडे जवळपास 967 ग्रॅम सोनं असल्याचं माहिती आहे. सोन्यासह त्यांच्याकडे चांदीही मोठ्या प्रमाणात असल्याचं बोललं जातं.