Alia Bhatt Trolled : आज महिला दिनाच्या निमित्तानं आलिया भट्टन सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिनं शेअर केलेली ही पोस्ट पाहून सगळ्यांना आश्चर्य झाले आहे. खरंतर तिनं हार्ट शेप म्हणजेच हृदयाच्या आकाराचं सॉफ्ट टॉयचा एक फोटो शेअर केला आहे. त्यासोबत आलियानं दिलेल्या कॅप्शननं नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलियानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. खरंतर तिनं हार्ट शेपच्या सॉफ्ट टॉय पोस्ट केली आहे. ही पोस्ट शेअर करत तिनं कॅप्शन दिलं आहे की 'माझ्या छोट्या वूमननं माझ्यासाठी हे बनवलं आहे आणि मी हे तुमच्यासगळ्यांसोबत शेअर करत आहे. सगळ्या महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वत: साठी असलेला हा दिवस आनंदानं आणि आयुष्यभरा प्रत्येक दिवसातील एक मिनिट काढा.'



आलियानं शेअर केलेली ही पोस्ट नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. एक नेटकरी म्हणाला, 'राहा इतकी मोठी झाली की हे सगळं बणवते.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'राहाला शिवण काम येतं? 2 वर्षांच्या मुलीलाल हे बनवणं कसं शक्य आहे. मी फक्त उत्सुकतेपोटी विचारलं.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'छोटी मुलगी असं कसं बणवून शकते. हे मला खोटं वाटतंय.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'इतकी छोटी मुलगी कशी काय बनवू शकते काहीही खोटं बोलू नका.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'एक वर्षाची मुलगी हे कसं बनवू शकते? काहीही म्हणजे काहीही.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'आज कालची 1 वर्षाची मुलं शिवणकाम करतात!'


आलिया भट्टच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती स्टॅन्ड अलोन वायआरएफ स्पाय यूनिव्हर्स चित्रपटात दिसणार आहे. अशी चर्चा आहे की आलिया प्रोडक्शन हाउसच्या स्पाय यूनिव्हर्समध्ये तिची सुरुवात करणार आहे. तिच्या या चित्रपटावर शिक्कामोर्तब यशराज फिल्म्सचे सीईओ अक्षय विधानी यांनी फिक्की फ्रेम्स कार्यक्रमांदरम्यान केला.  


हेही वाचा : Shaitan Twitter Review: 'शैतान' जेव्हा घरात येतो! लोकांना नेमका कसा वाटला चित्रपट?


दरम्यान, आलिया भट्ट आणि राहा कपूरचे अनंत अंबानी आणि राधिकाच्या प्री-वेडिंग कार्यक्रमातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यात त्या दोघी प्रिंटेड ड्रेसमध्ये दिसत आहेत.