Diabetes: या सवयी असतील तर त्या ताबडतोब सोडा, अन्यथा तुम्हीही डायबिटीजचे बळी
Diabetes Control Tips: तुम्ही स्वत:ची काळजी घेतली नाहीतर आजाराला बळी पडू शकता. आजकाल मधुमेह (Diabetes) कोणालाही होऊ शकतो, परंतु अनेकवेळा आपल्या वाईट सवयींमुळे हा आजार बळावतो. तुम्ही या चुका केल्या नाहीतर यापासून तुमचा बचाव होईल.
How To Prevent Diabetes: आज अनेक जणांना डायबिटीजने (Diabetes) ग्रासलेले दिसून येत आहे. मधुमेहाचे जगभरात अनेक सापडतात. (Health News) दरम्यान, भारताला मधुमेहाची राजधानी देखील म्हटले जाते, कारण येथे रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. हा आजार एकदा का कोणाला झाला की तो आयुष्यभर पाठ सोडत नाही. जर तुम्हाला डायबिटीज होऊ नये असे मनापासून वाटत असेल तर काही गोष्टी जीवनात पाळल्या पाहिजेत. डायबिटीजमुळे किडनीचे आजार आणि हृदयविकाराचा झटका येण्याचाही जास्त धोका असतो. तुम्हाला कधीच मधुमेह होऊ नये असे वाटत असेल तर कोणत्याही परिस्थितीत रोजच्या जीवनातील काही सवयी बदललणे क्रमप्राप्त आहेत. (Diabetes Control Tips)
मधुमेह कसा टाळावा (Diabetes)
Diabetes हा अनेकवेळा अनुवांशिक कारणांमुळे होऊ शकतो. परंतु सामान्यतः तो वाईट जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे होतो. म्हणूनच तुमच्या सवयींमध्ये काही सुधारणा करणे चांगले आहे, जेणेकरून तुम्हाला हा आजार बळावणार नाही.
1. तुम्ही पुरेशी झोप घेत नसाल तर बळी
तुम्हाला फ्रेश राहायचे असेल तर निरोगी प्रौढ व्यक्तीने दिवसातून किमान 7 ते 8 तास झोप घेणे आवश्यक आहे. तुम्ही याची काळजी घेतली नाही तर अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. मधुमेहदेखील त्यापैकी एक आहे. कमी झोप घेतल्याने भूक नियंत्रित करणाऱ्या आणि रक्तातील ग्लुकोज राखणाऱ्या हार्मोन्सचा प्रभाव कमी होतो, सर्वप्रथम लठ्ठपणा वाढतो आणि मधुमेहाचा धोका निर्माण होतो. हे आपल्या सर्वांना माहिती असायला हवे.
2. न्याहारी करणे खूप महत्वाचे
आजच्या स्पर्धात्मक युगात आणि धावपळीच्या जगात आपण आपल्या खाण्याकडे लक्ष देत नाही. काहीही खाण्याला प्राधान्य देतो. आजकाल बरेच लोक शाळा, महाविद्यालय किंवा कार्यालयात जाण्याच्या नादात घाईत नाश्ता करतात किंवा टाळतात. परंतु यामुळे आपल्या आरोग्याचे खूप नुकसान होते. चुकूनही ही चूक करु नका, नाहीतर लवकरच तुम्ही डायबिटीसचे शिकार होऊ शकता. न्याहारी वगळल्यामुळे दुपारच्या जेवणापर्यंत भूक लागते, त्यामुळे रक्तातील साखर आणि इन्सुलिनची पातळी राखता येत नाही.
3. रात्री जेवल्यानंतर खाणे टाळा
रात्रीच्या जेवणानंतर खाण्याची सवय मधुमेह होण्यासाठी कारणीभूत ठरते. रात्रीच्या वेळी खाण्यापिण्याची आपली सवय मोठ्या प्रमाणात कारणीभूत असते. सर्वात आधी रात्रीच्या जेवणात सकस आहार घ्यावा आणि त्यानंतर रात्री काही खाण्याची सवय असेल तर ती आजच सोडा. बहुतेक आरोग्य तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की आहाराच्या पद्धतींमुळे रक्तातील साखर वाढू शकते. अशा स्थितीत इन्सुलिनचा स्रावही थांबतो. जर तुम्हाला रात्री उशिरा भूक लागत असेल तर चिप्स किंवा स्नॅक्स खाण्याऐवजी ड्रायफ्रुट्स खा. गोड गोष्टी पूर्णपणे टाळा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)