झोपेत तुम्हालाही झटके बसतात का? जाणून घ्या
दिवसभर थकल्यानंतर शरीलाला पुरेशा झोपेची आवश्यकता असते. अनेकदा काही व्यक्तींना झोपेत असताना शरीलाला झटके बसतात. तुम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का असे का होते?
मुंबई : दिवसभर थकल्यानंतर शरीलाला पुरेशा झोपेची आवश्यकता असते. अनेकदा काही व्यक्तींना झोपेत असताना शरीलाला झटके बसतात. तुम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का असे का होते?
याबाबत केलेल्या अभ्यासामध्ये असं दिसून आलंय की, ६० ते ७० टक्के लोकांना झोपेत असताना शरीराला झटके बसतात. यामागे विविध कारणे सांगण्यात आलीयेत. काहींच्या मते जेव्हा ते स्वप्नात पडत असतात अथवा एखाद्या गोंधळलेल्या अवस्थेत असतात तेव्हा शरीराला झटके बसतात.
वैज्ञानिकांच्या मते थकवा जाणवणे, तणाव असणे अथावा कॅफेनचे अधिक सेवन केल्यास झोपताना शरीराला झटके बसतात. दरम्यान, याबाबत कोणत्याही अभ्यासात वा रिपोर्टमध्ये या कारणांना दुजोरा दिला.
हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते संध्याकाळच्या वेळेस फिजिकल अॅक्टिव्हिटीही या झटक्यांना कारणीभूत ठरु शकते. दरम्यान याबाबतचा ठोस रिसर्च समोर आलेला नाहीये.