Uric Acid Home Remedies : आरोग्यासाठी पुदिनामध्ये असे काही गुणधर्म आहेत जे तुम्हाला अनेक शारीरिक समस्यांमध्ये मदत करू शकतात. पुदिन्यात काही अँटिऑक्सिडेंट असतात जे गाउटच्या म्हणजेच युरिक ऍसिडच्या समस्येवर प्रभावीपणे काम करतात. या व्यतिरिक्त, ते वात, पित्त आणि कफ देखील संतुलित करते आणि नंतर पोटाचा चयापचय दर वाढवते. तुम्ही जे काही खाता ज्यामध्ये प्रथिने भरपूर असते आणि त्यात प्युरीन असते. अशावेळी पुदिना खाल्ल्याने ते लवकर पचते आणि याचमुळे ते युरिक ऍसिडच्या रूपात जमा होत नाही. यूरिक ऍसिडसाठी पुदिन्याच्या पानांचा वापर कसा करावा हे समजून घेणे गरजेचे असते. कारण गाऊटच्या समस्येवर कायम औषधं न घेता घरगुती उपाय देखील फायदेशीर ठरतात. 


पुदिन्याची पाने कशी वापरावी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुदिन्याच्या पानांमध्ये अनेक पोषकतत्व असतात जे शरीरातील यूरिक ऍसिड नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. 


  • - 8-10 ताजी पुदिन्याची पाने घ्या आणि धुवा.

  • - ही पाने ब्लेंडरमध्ये टाका आणि अर्धा कप पाणी घाला. त्यांचे मिश्रण करा.

  • - ही पेस्ट एका कढईत ठेवा आणि त्यात गूळ घाला.

  • - ओवा घाला आणि नंतर गॅस बंद करा.

  • -आता हे मिश्रण 1 चमचे दिवसातून 3 वेळा घ्या.


(हे पण वाचा - युरिक ऍसिडला शरीरातून खेचून बाहेर काढतील 5 भाज्या, सांधेदुखीपासून मिळेल आराम)


पुदिन्याच्या पानांचे फायदे


पुदिन्याच्या पानांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म भरपूर असतात जे हाडांचे दुखणे कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे हाडांची सूज कमी होते. चयापचय दर वाढवण्याव्यतिरिक्त, ते शरीरातील प्युरिनचे प्रमाण कमी करते एवढंत नव्हे तर ते रोखण्यासाठी मदत करतात. अशा प्रकारे, पुदिन्याची पाने शरीरात यूरिक ऍसिड वाढू देत नाहीत आणि पचनाशी संबंधित समस्या कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे युरिक ॲसिडचे प्रमाण वाढले असेल तर पुदिन्याचा अर्क घ्यावा. याशिवाय तुम्ही रिकाम्या पोटी पुदिन्याची पाने देखील चावू शकता. याशिवाय तुम्ही त्याचा चहा पिऊ शकता किंवा त्याचा रस देखील घेऊ शकता. तर, अशा प्रकारे ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे.


(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)