मुंबई : केरळसह देशभरात सध्या 'निपाह' व्हायरसची दहशत पसरली आहे. या व्हायरसच्या संपर्कात आल्याने केरळमध्ये 11 जणांनी आपले प्राण गमावले आहेत, तर 20 रूग्णांवर उपचार सुरू आहे. प्रामुख्याने वटवाघुळांमधून 'निपाह' व्हायरस मनुष्य आणि इतर प्राण्यांच्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे आता वटवाघुळांच्या रक्ताची आणि सिरमची लॅबटेस्ट करण्यात आली आहे.  


लॅबटेस्टचा निकाल  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वटवाघुळांच्या 'फ्रुट बॅट' या प्रजातींच्या वटवाघुळामुळे 'निपाह' व्हायरस पसरतो त्यामुळे केरळमधील काही वटवाघुळांची लॅब टेस्ट करण्यात आली. मात्र त्याचे सारे रिपोर्ट्स निगेटीव्ह आले आहेत. यामध्ये 'निपाह' व्हायरस पसरण्यामागे वटवाघुळ हे प्रमुख कारण नसल्याचे सांगण्यात आले आहे.   'निपाह' व्हायरसची दहशत पसरवाणारी करोडो वटवाघुळं 'या' गावात एकत्र फळं खातात


कशामुळे पसरला 'निपाह' ? 


केरळमध्ये 'निपाह' व्हायरसचा संसर्ग झाल्याने 26 वर्षीय मोहम्मद साबिथचा सर्वात पहिला बळी गेला आहे. त्याच्या परिवारातील अन्य तीन लोकांचाही मृत्यू निपाह व्हायरसमुळे झाला आहे. मोहम्मद सौदी अरबअम्ध्ये हेल्पर म्हणून काम करत होता. तेथूनच तो भारतामध्ये परतला होता. Nipah Virus चा धोका पाहता फळं खाणं टाळावे का?


वटवाघुळांमध्ये नैसर्गिकरित्या सापडतो 'निपाह' 


निपाह व्हायरस हा वटवाघुळांमध्ये नैसर्गिकरित्या सापडतो. त्यांच्यामार्फत इतर प्राणी आणि मानवी शरीरात त्याचा प्रसार होतो. आता 'निपाह' चा प्रसार नेमका कशामुळे होत आहे ? याचा पुढील प्रसार सुरू आहे.  मग अशा स्थितीत Nipah Virus चा धोका ! सध्या केरळ ट्रीप करणं खरंच सुरक्षित आहे का?