... म्हणून एक मुलगा आणि मुलगी कधीच `फक्त बेस्ट फ्रेड्स` नसतात
एक मुलगा आणि मुलगी कधीच फक्त फ्रेंड्स असू शकत नाही.
मुंबई : एक मुलगा आणि मुलगी कधीच फक्त फ्रेंड्स असू शकत नाही. यावर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्येही अनेकदा चर्चा रंगल्या असतील, वाद झाले असतील. पण हे खरंच आहे ? प्रत्येक नात्याला मर्यादा आणि नावाचं लेबल असणं गरजेचे आहे का?
मैत्रीचं नातं निखळ असेल तर अधिक वर्ष टिकतं असं म्हणतात. म्हणूनच तुमच्याही आयुष्यात असलेल्या मित्रपरिवाराला असंच टिकवून ठेवा. एक मुलगा आणि मुलगी चांगले मित्र असू शकतात पण ते 'बेस्ट फ्रेंड्स' फार काळ का राहू शकत नाही? हे तुम्हांला ठाऊक आहे का ? या '५' गोष्टींवरुन ओळखा तुमच्या मित्र-मैत्रिणीचा खरेपणा!
1. नात्यांमध्ये गुंतागुंत
मैत्रीचं नातं म्हटलं की एकमेकांबाबत प्रेम, काळजी या भावना आल्याच पण नकळत या नात्यामध्ये आपण इतके गुंतून जातो की हे एकमेकांबद्दल वाटणार्या खोल प्रेमाचे संकेत असू शकतात.
2. 'तुम्ही एकमेकांना डेट करताय?' या प्रश्नाचा मारा
अनेकदा केवळ एक मुलगा आणि मुलगी फक्त दोघंचं बाहेर भेटले, जेवायला गेले तर लोकं त्यावर 'कपल' म्हणून थेट शिक्का मारतात. तुम्हा दोघांना असे बाहेर फिरणं, भेटणं 'विचित्र' वाटत नसलं तरीही समाजात अशा मैत्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. रोमॅन्टिक नात्याला सुरूवात करण्यापूर्वी विचारा हे '10' प्रश्न
3. समोरच्या व्यक्तीच्या मनातील भावना तुम्हांला क्वचित ठाऊकच नाही
कदाचित तुमच्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या मनात तुमच्याबद्दल प्रेमाची भावना असू शकते. कदाचित हे सिक्रेट लव्हचे संकेत असू शकतात.अनेकदा तुम्ही हा प्रश्न स्वतःला विचरलात तर कदचित सरळं नीट होईल किंवा मैत्रीचं सारं नातं बिघडूदेखील शकतं. बेस्ट फ्रेंड आवडू लागल्यास या ३ गोष्टी करा!
4. इतरांसोबत बघून 'जलस' (मत्सर भावना) वाटणं
तुमचा मित्र किंवा मैत्रिण इतरांना डेट करायला लागला की कदाचित तुम्हांला त्याचा राग येऊ शकतो. तुमच्यासाठी असलेला वेळ इतरांना देत असल्याने असो किंवा तुम्हांला त्या व्यक्तीला डेट करायचे आहे म्हणून ही भावना निर्माण होऊ शकते. यासोबतच कदाचित तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीच्या आयुष्यात असणारी 'ती' खास व्यक्ती तुमच्या आयुष्यात का नाही? म्हणूनदेखील तुम्हांला त्रास होऊ शकतो.
5. मैत्रीत अपेक्षा
तुमच्या दोघांमध्ये मैत्रीचं स्ट्रॉग बॉन्डींग असल्याने काही गोष्टी तुम्ही गृहीत धरता. मात्र जेव्हा तुमच्या अपेक्षेप्रमाणे या गोष्टी होत नाहीत तेव्हा तुम्हांला त्रास होऊ शकतो. असा त्रास इतर मित्र-मैत्रीणींसोबत होत नाही.
6. पालकांकडे लग्नाचा तगादा
एक मुलगा आणि मुलगी केवळ बेस्ट फ्रेड असू शकतात हे मूळातच समाजाची मानसिकता नसल्याने पालकही तुमच्या मैत्रीला,ओळखीला, एकमेकांना समजून घेण्याच्या क्षमतेला गृहीत धरुन लग्न करण्याचा तगादा लावतात.
7. अपेक्षाभंगाचं दु:ख
अपेक्षाभंगाचं दु:ख जास्तच त्रासदायक असतं. इतर मित्रांपेक्षा तुमच्या बेस्ट फ्रेंडकडून काही चूकीचं घडल्यास त्याचा मनस्ताप अधिक होतो आणि परिणामी नातं बिघडत.