लग्न ठरवताना वधू वराच्या वयात अंतर ठेवणं का गरजेचं?
पूर्वीच्या काळी लग्न ठरवताना वधू वरांमध्ये असलेल्या वयाच्या अंतराचा निकष प्रामुख्याने लावला जात असे.
मुंबई : पूर्वीच्या काळी लग्न ठरवताना वधू वरांमध्ये असलेल्या वयाच्या अंतराचा निकष प्रामुख्याने लावला जात असे. मुलापेक्षा किमान 5-6 वर्ष लहान वयाच्या मुलीसोबत लग्न लावून दिले जात असे. हा विचार करण्यामागे घरातील वडीलधारी मंडळींचा नेमका काय विचार होता? हे तुम्हांला ठाऊक आहे का? पुरूषांसाठी लग्न करण्याचे ५ योग्य संकेत
मुली अधिक समजुतदार
मुलांच्या तुलनेत मुली अधिक समजुतदार असतात. अनेकदा समान वयाच्या जोडप्यांमध्ये भांडणं अधिक होतात कारण त्यांचे विचार जुळत नाहीत. ऑनलाईन वधू वराची निवड करताना या '4' गोष्टीचं भान ठेवा
पुरूषांच्या तुलनेत महिलांचे वय अधिक दिसते
बदलत्या वेळेनुसार स्त्रीयांच्या शरीरात हार्मोनल बदल अधिक होतात. त्यामुळे पुरूषांपेक्षा स्त्रियांचे वय अधिक दिसते. पतीपेक्षा मुलगी अधिक मोठी दिसू नये म्हणून त्याच्यापेक्षा किमान5-6 वर्ष लहान मुलीसोबत लग्न ठरवले जात असे. 'या' वयातील महिला अधिक रोमॅन्टिक !
भावूक असतात मुली
मुलांच्या तुलनेत मुली अधिक भावूक असतात. त्यामुळे आपल्या मुलीला भावानिक आधार मिळावा यादृष्टीने तिच्या साथीदाराची निवड तिच्यापेक्षा मोठ्या पुरूषासोबत केली जात असे. बॉयफ्रेंडशी लग्न झाल्यास या ५ गोष्टी बदलतात!
जबाबदारीचे भान
मुलगा मोठा असेल तर संसारात लहान मोठ्या गोष्टींमध्ये त्याची मदत मिळावी ही पालकांची अपेक्षा असते. दोघेही समवयस्कर असल्यास हा समतोल राखला जाऊ शकत नाही. परिणामी अशा नात्यांमध्ये खटके उडण्याची शक्यता अधिक असते. तुमच्या पार्टनरला अधिक रोमँटिक करतील या टिप्स