ऑनलाईन वधू वराची निवड करताना या '4' गोष्टीचं भान ठेवा

  आजकाल घरातल्या भाज्यांपासून ते अगदी जीवनसाथीची निवडही ऑनलाईन माध्यमातून केली जाते. 

Updated: Jun 3, 2018, 07:58 AM IST
ऑनलाईन वधू वराची निवड करताना या '4' गोष्टीचं भान ठेवा title=

मुंबई :  आजकाल घरातल्या भाज्यांपासून ते अगदी जीवनसाथीची निवडही ऑनलाईन माध्यमातून केली जाते. लाईफ पार्टनर शोधण्यासाठी आजकाल अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. पूर्वी घरातील वडीलधारी मंडळी एकत्र जमून सुयोग्य वधू-वराची निवड करत असत. मात्र आता ही जागा 'ऑनलाईन मेट्रिमोनियल साईट्स'ने घेतली आहे. या माध्यमातून तुमच्या साथीदाराची निवड करण्यापूर्वी काही गोष्टीचं भान ठेवा. 

वैयक्तित माहिती प्रसिद्ध करण्याची घाई नको - 

एखादं प्रोफाईल आवडल्यानंतर थेट तुमची सारी वैयक्तिक माहिती शेअर करू नका. हळूहळू तुमच्यामधील बोलणं सुरू होईल. तुमची एकामेकांना नीट ओळख पटल्यानंतरच घराचा पत्ता, घरातील परिस्थिती याबाबतची माहिती शेअर करा. 

योग्य आणि सुरक्षित ठिकाणी भेटा - 

तुमची ऑनलाईन माध्यमातून ओळख झाल्यानंतर कुठे भेटणार हे ठरवताना सावध रहा. शक्यतो मुलींनी एकटं जाणं टाळा. तुमच्या मित्रपरिवारातील किंवा  भावंडांपैकी एखादी समवयीन व्यक्ती तुमच्यासोबत ठेवा. यामुळे तुम्ही खुलेपणाने आणि सुरक्षितपणे बोलू शकाल.  

खात्री करून घ्या - 

ऑनलाईन दिलेली सारीच माहिती खरी असेल असा आंधळेपणाने विश्वास टाकू नका. माहितीची खात्री करून घ्या. त्यांच्या परिवाराबद्दल, मित्रमंडळींमध्ये चौकशी करून घ्या. 

कुटुंबासोबत मनमोकळेपणाने बोला - 

तुम्हांला एखाद्या मुलाचं प्रोफाईल आवडल्यानंतर, त्याला भेटल्यानंतर तुमची पसंती घरातील व्यक्तींसोबतही नक्की शेअर करा. दोन्ही कुटुंबाने एकत्र भेटून लग्नाविषयी निर्णय घेतल्याने फसवणूक होण्याची शक्यता कमी होते.