मुंबई : वाढत्या वयोमानासोबत किडनीचं आरोग्यदेखील खालावते. त्यामुळे अरबट चरबट खाण्यावर आणि जीवनशैलीशी निगडीत आजारांवर नियंत्रण ठेवणं गरजेचे आहे. अन्यथा क्रोनिक किडनी डिसीजचा धोका बळावतो. 


डायलिसिसच्या त्रासातून मुक्तता 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किडनीचं कार्य खालावल्यानंतर शरीरातील घातक घटक बाहेर टाकण्यासाठी अनेकदा क्रोनिक किडनी डिसीजच्या रुग्णांना डायलिसीसची मदत घ्यावी लागते. मात्र डायलिसिस ही वेदनादायी आणि खर्चिक प्रक्रिया आहे. किडनीविकाराच्या रुग्णांना 'रेनाडिल' ठरणार नवी आशा


मुंबईत घडला चमत्कार  


मुंबईमध्ये 59 वर्षीय सुहासिनी धोके या महिलेला गेल्या 9 वर्षापासून मधूमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यानंतर कालांतराने त्यांना क्रोनिक किडनी डिसिजचा त्रास होण्यास सुरूवात झाला. या स्थितीचा सामना करण्यासाठी त्यांना कायम डायलिसीसची मदत घ्यावी लागली. 


स्टेरॉईड थेरपीची मदत  


जसलोक हॉस्पिटल्सचे डॉ. ऋषी देशपांडे यांनी त्यांच्यावर उपचार केले. क्रोनिक किडनी डिसीजचा त्रास आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी रेनल बायोप्सी आणि स्टेरॉईड थेरपी करण्याचे ठरवले. डॉक्टरांच्या प्रयत्नांनाही यश मिळाले. हळूहळू क्रेटानिनचं प्रमाण आटोक्यात आलं. डायलिसिसची आवश्यकताही आठवड्याला 3 वेळेस वरून 2 वेळेस आणि कालांतराने नाहीशी झाली. आता सुहासिनींना डायलिसिसची मूळीच गरज नाही.