महिलांनी लघुशंका करताना `या` गोष्टी अजिबात करु नका, एक चूक पडू शकते महागात
Intimate Hygiene Tips: दिवसभरात अनेकदा लघवी करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. असे नाही केले तर गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते. यामध्ये विशेषत महिलांना या समस्यांचा जास्त सामना करावा लागू शकतो.
Intimate Hygiene Tips For Women: अनेकदा आपण बाहेरचे काम, कामाचा इतर ताण, अस्वच्छ शौचालये किंवा सार्वजनिक ठिकाणी लघुशंकेला (public toilet) जाण्यास घाण वाटणे यांसारख्या अनेक कारणांना लघुशंका आपण बऱ्याच वेळ दाबून ठेवतो. अनेकदा तर लघुशंका होईल म्हणून कित्येक तास पाणीच पित नाही. असे करणे त्या वेळेस योग्य वाटत असेल तर पण आरोग्यासाठी एकूणच घातक असते. लघुशंका लागणे हे ज्याप्रमाणे नैसर्गिक आहे त्याचप्रमाणे वेळच्या वेळी ती बाहेर पडणेही आवश्यक आहे. अन्यथा आरोग्याच्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते. महिलांना विशेषत: या समस्यांना जास्त प्रमाणात सामना करावा लागू शकतो. लघुशंका करताना काही चूकांमुळे इन्फेक्शन खूप जास्त वाढू शकते ज्या कित्येक वेळा तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकते. अशा परिस्थितीत महिलांनी आपल्या सवयी बदलणे आणि काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
प्रायव्हेट पार्ट जास्त पुसणे : लघुशंका केल्यानंतर प्रायव्हेट पार्ट कोरडा (Private part dry) ठेवण्यासाठी पार्ट पुसणे आवश्यक आहे. पण हेच तुम्ही जास्त वेळ करत राहिला तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. तसेच त्वचेची जळजळ आणि प्रायव्हेट पार्टला खाज येऊ शकते.
मागचा आणि पुढचा भाग पुसा: प्रायव्हेट पार्ट साफ करताना मागून पुढच्या बाजूने कधीही पुसरणार नाही याची विशेष काळजी घेतली पाहिजे. आपले गुदद्वाराचे (anal) बॅक्टेरिया अगदी सामान्य असतात, परंतु योनीमार्गाच्या वरच्या भागात हे जीवाणू पुढे येतात, जे तुमच्या मूत्रमार्गात सहज प्रवेश करू शकतात आणि यामुळे मूत्रमार्गात संसर्ग होण्याचा धोका वाढतो. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनमुळे महिलांना खाजगी भागात जळजळ आणि वेदना होतात.
वाचा: डायबिटीज रुग्ण या 4 प्रकारांनी वजन कमी करु शकतात !
लघवीसाठी वेळ निश्चित करा: लघुशंका करण्यासाठी ठराविक वेळ निश्चित करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकते. हे मूत्राशय योग्यरित्या लघवी गोळा करण्यापासून रोखतात. मूत्राशय साधारणतः 450 ते 500 मिलीपर्यंत लघुशंका साठवून ठेवते. जर तुम्हाला दर अर्ध्या तासाने लघवीला जात असाल तर मूत्राशयात फारच कमी लघवी जमा होते, त्यामुळे मूत्राशय नीट काम करत नाही आणि तुम्हाला काही काळ लघवी होत असल्याचा भास होतो.
लघुशंका येत असतानाही दाबून ठेवणे: मूत्राशय पूर्णपणे भरलेला नसला तरीही लघुशंका करणे ही वाईट सवय आहे. परंतु लघुशंका आल्यानंतर ती दाबून ठेवणे आणखी वाईट आहे. यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.
जास्त पाणी प्या: दिवसभरात 2 ते 3 लिटर पाणी पिणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते, जर तुम्ही व्यायाम करत असाल तुम्ही भरपूर पाणी पिऊ शकता. परंतु असे बरेच लोक आहेत जे दिवसातून 6 ते 7 लिटर पाणी पितात ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. तुम्ही जास्त पाणी पिऊन स्वतःला हायड्रेट करण्याचा प्रयत्न करा. जास्त प्रमाणात द्रव सेवन केल्यामुळे, मूत्राशय जास्त लघवी तयार करतो. त्यामुळे वारंवार शौचालयात जावे लागते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)