नवी दिल्ली : Another monkeypox patient in Delhi:  गेल्या दोन वर्षात कोरोनाने अनेकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. फक्त भारतच नाही तर जगभरात कोरोनाने (Corona virus) धुमाकूळ घातला होता. अशातच आता जगभरात मंकीपॉक्सचे (Monkeypox ) रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहेत. जगभरात आतापर्यंत तब्बल 52,997 पाॅझिटिव्ह रूग्ण आढलले आहेत. तर भारतात देखील मागील तीन आठवड्यापासून मंकीपॉक्स रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. दरम्यान, राजधानी दिल्लीत आणखी एक रुग्ण सापडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्य आणि केंद्र सरारकार सतर्क झाले आहे.


परदेशातून आलेली महिला पाॅझिटिव्ह 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नायझेरियावरुन दिल्लीत आलेली एक 30 वर्षांची महिला मंकीपॉक्स (Monkeypox ) पाॅझिटिव्ह आढळली. त्यामुळे आता भारतातील संख्या ही 13 वर पोहोचली असून त्यातील 8 रुग्ण दिल्लीत आढळून आले आहेत. महिलेला उपचारासाठी लोक नायक जयप्रकाश नारायण रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मंकीपॉक्सच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे जागतिक आरोग्य संघटनेने देखील याआधी सतर्कतेचा इशारा दिला होता.


मंकीपॉक्सचा जगभरात धुमाकूळ


जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO)दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2022 पासून 14 सप्टेंबर या काळात 103 देशात मंकीपॉक्सने रुग्ण आढळले आहेत. त्यातील मागील चार आठड्यात 70 टक्के केसेस अमेरिकेत तर 28.3 टक्के रुग्ण युरोपात आढळले. काही दिवसापूर्वीच ब्रिटनमध्ये मंकीपॉक्सचा नवा स्ट्रेन सापडल्याने खळबळ उडाली होती.


दक्षिण अफ्रिकेतून ब्रिटनमध्ये आलेल्या रुग्णामध्ये नवा स्ट्रेन आढळला होता. त्यानंतर WHO युरोपिय देशांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं होतं. संक्रमित असलेल्या रुग्णांना 7 ते 14 दिवसांनंतर डोकेदुखी, ताप, अंग दुखणे आणि अशक्तपणा जाणवतो. मंकीपॉक्स रुग्णांना मानसिक त्रासाचादेखील सामना करावा लागत आहे.